गरमागरम पुरी खायला सर्वांनाच आवडते. काहीजण भाजीसोबत तर काहीजण श्रीखंड, बासुंदीसोबत पुरी खाण्याचा आनंद घेतात. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याच्या रसासोबत पुरी खायला बऱ्याचजणांना आवडते. पुरी परफेक्ट होत नाही, तेल शोषून घेते, फुगत नाही अशा तक्रारी पुरी करताना जाणवतात. पण उत्तम पुरी बनवण्याचा गुपीत पुरी बनवण्याच्या प्रक्रियेतच लपलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही पीठ मळलं आणि पुऱ्या केल्या तर सॉफ्ट, फुगलेल्या पुऱ्या होतील. पुरी करण्याच्या ३ ट्रिक्स पाहूया. (How To Make Perfect Soft And Fluffy Puri How To Make Puri At Home)
पुरीच्या पिठात हे पदार्थ मिसळायला विसरू नका
जर तुम्हाला पुरी हलकी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही पिठात थोडा रवा मिसळा. जर तुम्ही २ कप गहू घेतले असतील तर त्यात २ चमचे रवा मिसळा. यामुळे पुरीचं टेक्चर चांगलं होतं आणि तळल्यानंतर पुरीचा रंग सोनेरी आणि आकर्षक येईल.
पुरीच्या सॉफ्टनेसचं सिक्रेट काय?
फक्त कुरकुरीत नाही तर पुरी सॉफ्टही असायला हवी त्यासाठी पिठात थोडा मैदा मिसळू शकता. २ कप मिठात २ मोठे चमचे मैदा मिसळ्यास पुरी सॉफ्ट होते आणि जास्त तेलही शोषून घेत नाही. रवा आणि मैद्याचं हे कॉम्बिनेशन पुरीला परफेक्ट संतुलन देते.
असंं मळा परफेक्ट पीठ
पुरीची चव आणि टेक्स्चर वाढवण्यासाठी तुम्ही पीठ कसं मळता ते फार महत्वाचं असतं. ज्यामुळे चव चांगली येते. १ छोटा चमचा साखर घातल्यानं पुरीचा रंग छान येतो. त्यानंतर २ चमचे तेल घालून पीठ मळून घ्या. नंतर पिठात गरजेनुसार कोमट पाणी घालून मळा. यामुळे चपातीचे टेक्चर सुधारते आणि पुरी परफेक्ट होते.
पुरीचं पीठ जास्त सैल नको अती घट्टही नको
पुरीचं पीठ नेहमीच घट्ट असायला हवं याची काळजी घ्या. जर पीठ सैल असेल तर पुऱ्या लाटायला त्रास होतो आणि पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात. पीठ मळताना एकदम सगळंच पाणी न घालता हळूहळू पाणी घाला. पीठ मळल्यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवा. यामुळे पुरीचं टेक्स्चर चांगलं होईल आणि पुऱ्या उत्तम होतील.
