Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळा वाळवण स्पेशल: जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत मसाला कैरी! एक थेंब तेलही न वापरता टिकेल वर्षभर- पाहा सोपी रेसिपी

उन्हाळा वाळवण स्पेशल: जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत मसाला कैरी! एक थेंब तेलही न वापरता टिकेल वर्षभर- पाहा सोपी रेसिपी

Zero oil raw mango pickle for long term storage: Spicy and tangy sun-dried mango snack: मसाला कैरी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 09:30 IST2026-04-24T09:30:00+5:302026-04-24T09:30:02+5:30

Zero oil raw mango pickle for long term storage: Spicy and tangy sun-dried mango snack: मसाला कैरी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.

Oil-free spicy dried raw mango recipe How to store masala keri for one year without oil Summer special Maharashtrian valvan recipes Traditional sun-dried masala mango chunks | उन्हाळा वाळवण स्पेशल: जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत मसाला कैरी! एक थेंब तेलही न वापरता टिकेल वर्षभर- पाहा सोपी रेसिपी

उन्हाळा वाळवण स्पेशल: जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत मसाला कैरी! एक थेंब तेलही न वापरता टिकेल वर्षभर- पाहा सोपी रेसिपी

उन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येक घरात लगबग सुरु होते ती म्हणजे वर्षभराच्या साठवणीच्या पदार्थांची. पापड, कुरड्या आणि लोणच्यासोबत मसाला कैरी हे एक असे वाळवण आहे, जे जेवणाची लज्जत द्विगुणित करते. अनेकदा लोणचे किंवा साठवणीचे पदार्थ म्हटले की त्यात तेलाचा वापर केला जातो.(Masala Kairi Recipe) पण सध्याच्या आरोग्यदायी जीवनशैलीत अनेकांना तेलकट पदार्थ टाळायचे असतात. अशा वेळी 'एक थेंबही तेल न वापरता' वर्षभर टिकणारी मसाला कैरी बनवणे ही एक मोठी कला आहे.(How to store masala keri )
ही मसाला कैरी फक्त चवीला चटपटीत नसते. ती वाळवून तयार केली जाते. ज्यामुळे ती वर्षभर टिकू शकते. या चटपटीत मसाला कैरीची रेसिपी शगुन किचन मराठी (Shaguns Kitchen Marathi) या यूट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आली आहे. डाळ-भात असो किंवा साधी पोळी, तोंडी लावायला ही मसाला कैरी असेल तर जेवणाची चव कित्येक पटीने वाढते.(Valvan Special) या पद्धतीत कैरीतील पाण्याचा अंश पूर्णपणे काढून टाकून तिला मसाल्यात घोळवून उन्हात वाळवले जाते. यामुळे कैरी मऊ पडत नाही आणि तिला बुरशी देखील लागत नाही. ही रेसिपी कशी करायची पाहूया. 

उन्हाळ्यात मुलांसाठी करा खास 'मँगो पुडिंग'; गारेगार डेझर्ट पाहून मुलं म्हणतील, "आई, अजून हवं!"

साहित्य 

कैऱ्या - अर्धा किलो 
लाल तिखट - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
हळद पावडर - अर्धा चमचा
काळी मिरी पावडर - अर्धा चमचा 
काळे मीठ - अर्धा चमचा
मीठ - पाव चमचा
पिठीसाखर - ३ चमचे

कृती 

1. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून घ्या. त्यानंतर कैरीच्या वरचे साल काढून घ्या. आता कैरीचे लांब आकारात उभे काप करा. 

2. सर्व कैऱ्या व्यवस्थित चिरुन झाल्यानंतर एका मोठ्या ताटात घ्या. त्यात वरुन हळद, जिरे पावडर, काळी मिरी पावडर, काळे मीठ, लाल तिखट, मीठ आणि पिठीसाखर घाला. चमच्याने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करुन घ्या. 

3. ताटात एक एक करुन सर्व मसाला कैरी पसरवून घ्या. कडक उन्हात दोन ते तीन दिवस मस्त वाळवून घ्या. कैऱ्या आतून व्यवस्थित सुकल्यानंतर काचेच्या डब्यात स्टोर करा. तयार होईल चटपटीत चटकदार मसाला कैरी. 

Web Title : धूप में सुखा मसालेदार आम: तेल-मुक्त, साल भर चलने वाला स्वादिष्ट! आसान रेसिपी

Web Summary : तेल-मुक्त, साल भर चलने वाला मसाला कैरी बनाएं। शगुन किचन मराठी की यह धूप में सुखी आम की रेसिपी किसी भी भोजन को बढ़ाती है। मसालेदार आम के टुकड़ों को धूप में तब तक सुखाया जाता है जब तक कि नमी निकल न जाए, जिससे यह खराब नहीं होता।

Web Title : Sun-dried Spicy Mango: Oil-free, year-long deliciousness! Easy recipe inside.

Web Summary : Make oil-free, year-long masala kairi. This sun-dried mango recipe from Shagun Kitchen Marathi enhances any meal. The process involves drying spiced mango pieces in the sun until moisture is removed, which prevents spoilage.