Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळा स्पेशल झणझणीत कैरीचं पिठलं! भाकरीसोबत लागेल मस्त - एकदा खा, चव विसरणार नाही...

उन्हाळा स्पेशल झणझणीत कैरीचं पिठलं! भाकरीसोबत लागेल मस्त - एकदा खा, चव विसरणार नाही...

Kairicha Pithale Recipe : How To Make Kairicha Pithale At Home : कैरीचं पन्हं आणि लोणचं तर नेहमीचंच! कधी 'कैरीचं पिठलं' खाल्लंय का? पाहा उन्हाळा स्पेशल रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2026 16:14 IST2026-04-21T16:06:56+5:302026-04-21T16:14:29+5:30

Kairicha Pithale Recipe : How To Make Kairicha Pithale At Home : कैरीचं पन्हं आणि लोणचं तर नेहमीचंच! कधी 'कैरीचं पिठलं' खाल्लंय का? पाहा उन्हाळा स्पेशल रेसिपी...

Kairicha Pithale Recipe How To Make Kairicha Pithale At Home | उन्हाळा स्पेशल झणझणीत कैरीचं पिठलं! भाकरीसोबत लागेल मस्त - एकदा खा, चव विसरणार नाही...

उन्हाळा स्पेशल झणझणीत कैरीचं पिठलं! भाकरीसोबत लागेल मस्त - एकदा खा, चव विसरणार नाही...

उन्हाळ्याचा सिझन आणि या सिझनमध्ये मिळणारी आंबट - गोड कैरी म्हणजे अस्सल खवय्यांसाठी पर्वणीच... हिरव्यागार कैरीची आंबट - गोड चव सगळ्यांनाचं वेड लावते. कैरीचं पन्हं, चटणी किंवा लोणचं आपण नेहमीच खातो, पण या कैरीच्या सिझनमध्ये भूक तृप्त करण्यासाठी जेव्हा ताटात गरमागरम 'कैरीचं पिठलं' येतं, तेव्हा जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. पारंपारिक पिठल्याला कैरीचा आंबट तडका देऊन बनवलेला हा पदार्थ केवळ चविष्टच नाही, तर तोंडाची चव वाढवणारा आहे. गरमागरम भाकरी, कांदा आणि सोबतीला कैरीचं हे झणझणीत पिठलं असेल, तर दोन घास जास्तच जातात(How To Make Kairicha Pithale At Home).

उन्हाळ्याच्या दिवसात भाजीला काय करावं हा प्रश्न पडला असेल, तर 'कैरीचं पिठलं' हा एक उत्तम आणि झटपट होणारा पर्याय आहे. साध्या पिठल्याला जेव्हा कैरीची आंबट - गोड चव  मिळते, तेव्हा त्याची चव दुपटीने वाढते. कडक उन्हात जेव्हा काहीच सुचत नाही, तेव्हा हा 'गावरान बेत' जिभेची चव तर वाढवतोच, सोबतच मनही तृप्त करतो. बेसनाचा दाटसरपणा आणि कैरीचा तो आंबट तडका असा काही जमून येतो की, जेवताना भाजीची गरजच भासत नाही. झटपट तयार होणारं आणि कमी साहित्यात बनणारं हे पिठलं भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागतं. लसणाची फोडणी, हिरवी मिरची आणि किसलेल्या कैरीचा स्वाद यामुळे हे पिठलं (Kairicha Pithale Recipe) घराघरात लोकप्रिय आहे. यंदाच्या उन्हाळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कैरीच्या पिठल्याची सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. तेल - १ ते २ टेबलस्पून 
२. जिरे - १ टेबलस्पून 
३. मोहरी - १ टेबलस्पून 
४. हिंग - चिमूटभर
५. कडीपत्ता - ४ ते ५ पाने 
६. लसूण - ६ ते ७ पाकळ्या
७. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या 
८. हळद - १/२ टेबलस्पून 
९. मीठ - चवीनुसार
१०. कैरीचा किस - १ कप 
११. बेसन - १/२ कप 
१२. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली) 
१३. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)

साठवलेले गहू-तांदूळ खराब होण्याचं टेंन्शन? पोत्यांजवळ ठेवा ५ पदार्थ,  उंदीर काय, साधी कीड - बुरशीही लागणार नाही... 


कोणती डाळ पाण्यांत किती वेळ भिजवावी आणि कशी शिजवावी? डाळ शिजवण्याची योग्य पद्धत - वरण, आमटी होईल चविष्ट... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका कढईत तेल घेऊन त्यात फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण असे सगळे जिन्नस घालून खमंग अशी फोडणी तयार करावी. (फोडणीत आपण नेहमीच्याच पिठल्याप्रमाणे व आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता.)
२. त्यानंतर तयार फोडणीत कैरीचा किस आणि चवीनुसार मीठ, हळद घालावी. 

३. बेसन पिठात पाणी घालून त्याचे पातळसर असे मिश्रण तयार करून घ्यावे. तयार फोडणीत हे बेसन पिठाचे मिश्रण घालूंन चमच्याने सतत हलवत राहावे गुठळ्या झाल्यास त्या मोडून घ्याव्यात. 
४. त्यानंतर या पिठल्यात वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. झाकण ठेवून एक हलकीशी वाफ काढावी.  
 
कैरीच्या आंबट - गोड चवीचं मस्त गरमागरम पिठलं खाण्यासाठी तयार आहे. वाफाळता भात किंवा भाकरीसोबत आपण हे चटपटीत चवीचं पिठलं खाऊ शकता.

Web Title : मसालेदार कच्चा आम पिठला: भाकरी के साथ एक ग्रीष्मकालीन आनंद!

Web Summary : इस गर्मी में, मसालेदार कच्चा आम पिठला का आनंद लें, जो कच्चे आम से बना एक महाराष्ट्रीयन व्यंजन है, जो भाकरी के साथ परिपूर्ण है। यह नियमित सब्जियों का एक त्वरित, स्वादिष्ट विकल्प है। नुस्खा में कच्चा आम, बेसन और मसाले जैसी सामग्री शामिल हैं, जो एक स्वादिष्ट और आसान भोजन प्रदान करते हैं।

Web Title : Spicy Raw Mango Pithla: A Summer Delight with Bhakri!

Web Summary : This summer, enjoy a tangy and spicy Kairiche Pithla, a Maharashtrian dish made with raw mango, perfect with bhakri. It's a quick, flavorful alternative to regular vegetables. The recipe includes ingredients like raw mango, besan, and spices, offering a delicious and easy meal.