Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वेटलॉससाठी परफेक्ट ज्वारीची खिचडी, पारंपरिक रेसिपीला द्या मॉडर्न तडका- घ्या चमचमीत रेसिपी

वेटलॉससाठी परफेक्ट ज्वारीची खिचडी, पारंपरिक रेसिपीला द्या मॉडर्न तडका- घ्या चमचमीत रेसिपी

Jwarichi Khichadi Recipe: ज्वारीची भाकरी आवडत नसेल तर ज्वारीची खिचडी करून खा. बघा एक मस्त रेसिपी...(how to make jowar khichadi?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 18:04 IST2026-05-11T18:04:00+5:302026-05-11T18:04:50+5:30

Jwarichi Khichadi Recipe: ज्वारीची भाकरी आवडत नसेल तर ज्वारीची खिचडी करून खा. बघा एक मस्त रेसिपी...(how to make jowar khichadi?)

jwarichi khichadi recipe, how to make jowar khichadi, jowar khichadi for weight loss  | वेटलॉससाठी परफेक्ट ज्वारीची खिचडी, पारंपरिक रेसिपीला द्या मॉडर्न तडका- घ्या चमचमीत रेसिपी

वेटलॉससाठी परफेक्ट ज्वारीची खिचडी, पारंपरिक रेसिपीला द्या मॉडर्न तडका- घ्या चमचमीत रेसिपी

Highlightsसध्या उन्हाळ्यात वन पॉट मील म्हणूनही ज्वारीची खिचडी हा एक उत्तम पदार्थ आहे. 

ज्वारीची भाकरी खाण्यास सध्या कित्येक लोक प्राधान्य देत आहेत. गव्हाच्या ऐवजी ज्वारीचे आहारातले प्रमाण वाढवत आहेत. कारण वेटलॉससाठी ज्वारी उत्तम मानली जाते. शिवाय ती पचायलाही हलकी असते. ज्वारीची भाकरी मधुमेह, हृदयविकार असे त्रास असणाऱ्यांसाठीही अगदी उत्तम आहे. त्यामुळेच जर तुम्हीही ज्वारी नियमितपणे खात असाल आणि भाकरी व्यतिरिक्त ज्वारीचे इतर काही पदार्थ तुम्हाला खाऊन पाहायचे असतील तर ज्वारीच्या खिचडीची ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहाच (how to make jowar khichadi?). ज्वारीचा भात किंवा खिचडी अनेक भागांत केली जाते (jowar khichadi for weight loss). त्याच रेसिपीला थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. ते कसं ते पाहूया....(jwarichi khichadi recipe)

ज्वारीची खिचडी करण्याची रेसिपी

 

ज्वारीची खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी १ वाटी ज्वारी घ्या. ती २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा..

पौष्टिक म्हणून ‘या’ भाज्या भरपूर खाणं म्हणजे पोटाच्या आजारांना आमंत्रण, १ चूक पोटाला ताप

यानंतर ज्वारी चांगली भिजली की कुकरमध्ये भिजलेली ज्वारी घाला. थोडं पाणी घाला आणि मध्यम आचेवर ७ ते ८ शिट्ट्या होईपर्यंत ज्वारी शिजवून घ्या.

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. यामध्ये तेल, मोहरी, हिंग, जिरे घालून फोडणी करून घ्या. यामध्ये आलं- लसूण पेस्ट आणि थोड्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कडिपत्ता घाला.

 

नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची अशा तुमच्या आवडीच्या भाज्या घाला.

भाज्या वाफवून झाल्या की त्यात शिजवलेली ज्वारी घाला. त्यात थोडे पनीरचे काप, चवीनुसार मीठ, तिखट, मसाला, घालून थोडी वाफ येऊ द्या.

जॉर्जेट साडी प्रत्येकीला दिसते सुंदर- पाहा स्वस्तात मस्त कलेक्शन, दीपिका पादुकोण-प्रिटी झिंटासारखा मिरवा जॉर्जेट साडी लूक

यानंतर बारीक चिरलेली कोेथिंबीर घालून मंद आचेवर पुन्हा १० मिनिटे झाकून ठेवा. ज्वारीची खमंग खिचडी तयार. सध्या उन्हाळ्यात वन पॉट मील म्हणूनही ज्वारीची खिचडी हा एक उत्तम पदार्थ आहे. 

 

Web Title: jwarichi khichadi recipe, how to make jowar khichadi, jowar khichadi for weight loss