Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चिली गार्लिक लच्छा पराठा! नाव ऐकूनच मुलं होतील खुश, एक काय दोन पराठे करतील फस्त, पाहा रेसिपी

चिली गार्लिक लच्छा पराठा! नाव ऐकूनच मुलं होतील खुश, एक काय दोन पराठे करतील फस्त, पाहा रेसिपी

Chili Garlic Lachha Paratha: मुलांना डब्यात काय वेगळं करून द्यावं असा प्रश्न पडला असेल तर त्यांना पुढील रेसिपीनुसार केलेला लच्छा पराठा करून एकदा खाऊ घाला...(perfect menu for kids tiffin and breakfast)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2025 15:42 IST2025-11-12T13:04:11+5:302025-11-12T15:42:35+5:30

Chili Garlic Lachha Paratha: मुलांना डब्यात काय वेगळं करून द्यावं असा प्रश्न पडला असेल तर त्यांना पुढील रेसिपीनुसार केलेला लच्छा पराठा करून एकदा खाऊ घाला...(perfect menu for kids tiffin and breakfast)

how to make lachha paratha, lachha paratha recipe, chili garlic lachha paratha by chef kunal kapoor  | चिली गार्लिक लच्छा पराठा! नाव ऐकूनच मुलं होतील खुश, एक काय दोन पराठे करतील फस्त, पाहा रेसिपी

चिली गार्लिक लच्छा पराठा! नाव ऐकूनच मुलं होतील खुश, एक काय दोन पराठे करतील फस्त, पाहा रेसिपी

Highlightsचिली गार्लिक लच्छा पराठा कसा करायचा याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मुलांच्या शाळा सुरू झाल्या की आता त्यांना डब्यात काय द्यावं असा प्रश्न त्यांच्या आईला नेहमीच पडतो. कारण मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं. रोज वेगवेगळं काय द्यावं हे मग कळत नाही. अशावेळी लच्छा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. रात्री जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा करू शकता. हा पराठा करण्यासाठी आधीपासूनच खूप काही तयारी करावी लागत नाही. शिवाय तो अगदी झटपट होतो (lachcha paratha recipe). चिली गार्लिक लच्छा पराठा कसा करायचा याची रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(how to make chili garlic lachcha paratha)

चिली गार्लिक लच्छा पराठा रेसिपी

 

साहित्य

भिजवलेली कणिक

ठेचलेला लसूण

फक्त १० मिनिटांत करा चीज गार्लिक ब्रेड, मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडेल असा पदार्थ, पाहा रेसिपी

मिरच्यांचे बारीक तुकडे

चाट मसाला आणि धनेपूड

बारीक चिरलेली कोथिंबीर

तूप 

 

कृती

आपण रोजच्या पोळ्या किंवा चपात्या करण्यासाठी ज्या पद्धतीने कणिक भिजवून घेतो तशीच कणिक भिजवून घ्या.

आता भिजवलेल्या कणकेचा एक छोटा गोळा घ्या आणि तो पोळीप्रमाणे लाटा. यानंतर लाटलेल्या पोळीवर थोडं तूप, चाट मसाला, धनेपूड, कोथिंबीर, लसूण आणि मिरची घालून ती पोळी एका बाजुने गोल गोल करत दुसऱ्या टोकापर्यंत न्या.

महागड्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही भारी लूक देणारे ॲण्टीक नेकलेस सेट, लग्नसराईसाठी परफेक्ट ८ डिझाईन्स..

यानंतर पोळीची पुन्हा एकदा चकलीप्रमाणे गोल गोल गुंडाळी आणि मग वरतून थोडं पीठ लावून पराठा लाटून घ्या. यानंतर तूप लावून तव्यावर हा पराठा खमंग भाजून घ्या. चिली गार्लिक लच्छा पराठा तयार. या पराठ्याला तुम्ही पनीर किंवा चीज घालूनही आणखी चवदार करू शकता. लोणचं, चटणी, भाजी, बटर यासोबत खायला लच्छा पराठा मस्त लागतो. 
 

Web Title : चिली गार्लिक लच्छा पराठा: बच्चों के लिए एक स्वादिष्ट और आसान रेसिपी

Web Summary : लंचबॉक्स विचारों पर अटके हैं? चिली गार्लिक लच्छा पराठा आजमाएं! सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर ने यह त्वरित, स्वादिष्ट रेसिपी साझा की है। यह सरल सामग्री के साथ बनाना आसान है और अतिरिक्त स्वाद के लिए पनीर या पनीर के साथ अनुकूलित किया जा सकता है। अचार, चटनी या मक्खन के साथ बिल्कुल सही।

Web Title : Chili Garlic Lachha Paratha: A Delicious & Easy Recipe for Kids

Web Summary : Stuck on lunchbox ideas? Try Chili Garlic Lachha Paratha! Celebrity Chef Kunal Kapoor shares this quick, tasty recipe. It's easy to make with simple ingredients and can be customized with cheese or paneer for extra flavor. Perfect with pickle, chutney, or butter.