How Much Oil Safe Per Day : खाण्या-पिण्याच्या जास्तीत जास्त गोष्टींमध्ये तेल टाकलं जातं. भाजी, डाळ, पराठे, स्नॅक्स आणि फास्ट फूडसारख्या गोष्टींमध्ये बरंच तेलं वापरलं जातं. तेलातून शरीराला फॅट मिळतं, ते आवश्यकही असतं. पण जास्त प्रमाणात तेल खाल्लं तर गंभीर आजारही होऊ शकतात. तेल जर जास्त खात असाल तर लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, फॅटी लिव्हर आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात निरोगी राहण्यासाठी आपल्याला माहीत असायला हवं की, रोज किती तेल खावं आणि किती खाल्लं तर आरोग्य बिघडू शकतं.
किती चमचे तेल खावं?
फूड सेफ्टी अॅन्ड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने ३० मार्च २०२६ रोजी आपल्या एक्स हँडलवर प्रसिद्ध लिव्हर डॉक्टर शिवकुमार सरीन यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात त्यांनी एका सामान्य वयस्क व्यक्तीने रोज जवळपास ५ ते ६ चमचे तेल किंवा तूप खाल्लं पाहिजे. एका चमच्यात साधारण ५ ग्रॅम तेल किंवा तूप येतं. यानुसार एका दिवसात २५ ते ३० ग्रॅम तेल किंवा तूप खाल्लं पाहिजे. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना काही आजार आहे त्यांनी तेल-तूप कमी खावं.
नॅचरल तेलावर लक्ष द्या
डॉक्टर पुढे सांगतात की, पराठ्यांवर जास्त तूप किंवा तेल लावू नये. असं केल्यास त्यातील तेलाचं प्रमाण वाढतं. खाण्या-पिण्याच्या बऱ्याच गोष्टींमध्ये नॅचरल ऑइल असतं. शेंगदाणे, बदाम, अक्रोड यातही तेल असतं. या गोष्टी खाल्ल्या तर शरीराला तेल मिळणार. या गोष्टीतील तेलामध्ये ओमेगा ३ असतं. जे आरोग्यासाठी चांगलं असतं. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यात आधीच तेल असतं. त्यामुळे तेल कमी प्रमाणातच खाल्लं पाहिजे.
How much oil are you consuming in a day? Is it within the safe limit? Watch renowned liver expert Dr. Shiv Sarin explain how much oil you can consume in a day & how keeping track of daily oil intake is an effective step in preventing obesity.#StopObesity#EatRightIndiapic.twitter.com/11y6SAqYc8
— FSSAI (@fssaiindia) March 30, 2026
खाण्यातील तेल कसं कमी कराल?
हेल्थ एक्सपर्टनुसार, ज्यांना डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, फॅटी लिव्हर किंवा हृदयरोगाची समस्या आहे, त्यांनी तेलाच्या प्रमाणाची खास काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तेलाचं प्रमाण ठरवावं. तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर रोज तेल वापरताना मोजूनच घ्या. डीप फ्रायऐवजी स्टीम, उकडणे किंवा ग्रिल अशा गोष्टी करू शकता. नॉन-स्टिक भांड्यांचा वापर करूनही तेलाचा वापर कमी करता येतो. त्याशिवाय बाहेरचे तळलेले-भाजलेले आणि प्रोसेस्ड फूड कमी खावेत.
