कडक उन्हाळा सुरु झाला की घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची पावलं सहज फ्रीजकडे वळतात. उन्हाळ्याच्या सु्ट्ट्यांमध्ये मुलांना सारखं काहीतरी थंड किंवा गोड खाण्याची इच्छा होते.(Roasted Gram Laddu Recipe) अशावेळी आपण बऱ्याचदा बाजारातील आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स किंवा पॅकबंद ज्यूस आणून मुलांना देतो.(Protein Rich Laddu) पण यामुळे मुलांच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी पोटाचे विकार, अपचन आणि उष्णतेचा त्रास वाढतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पोटाला थंडावा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आजी-पणजीच्या काळातील पारंपरिक, पौष्टिक आणि झटपट होणारा गोड पदार्थ म्हणजे फुटाण्याचा लाडू. (Traditional Maharashtrian Sweet)
फुटाणे हे आयुर्वेदानुसार थंड असतात. फुटाण्याचे लाडू खाल्ल्याने पोटातील जळजळ कमी होते. तसेच उन्हाळ्यात मुलं खेळून दमल्यानंतर हा लाडू मुलांसाठी प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी काहीतरी हेल्दी, हाय-प्रोटीन आणि तोंडात टाकताच विरघळणारा पदार्थ बनवायचा असेल, तर फुटाण्याच्या लाडूची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. (Futanyacha ladu recipe)
डोक्यातलं विचारांचं काहूर थांबेल फक्त ५ सेकंदात! ४-७-८ मन शांत करण्यासाठी सोपा उपाय
साहित्य
फुटाणे (काळे चणे)- १ वाटी
मखाने- १ वाटी
तूप- दीड वाटी
बदाम-काजू - १ छोटी वाटी
खरबुजाच्या बिया - २ चमचे
गूळ - दीड वाटी
सुक खोबरं - १ वाटी
वेलची पावडर - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी कढई गरम करुन त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर काजू- बदाम व्यवस्थित भाजून घ्या. एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच कढईत खरबुजाच्या बिया भाजून थंड होण्यास ठेवा.
2. त्याच कढईमध्ये मखाने हलके भाजून घ्या. मखाने कुरकुरीत भाजल्यानंतर हाताने दाबून बघा. आता किसलेले सुकं खोबरे व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर फुटाणे मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करा.
3. कढईमध्ये तूप गरम करुन पुन्हा ही पावडर व्यवस्थित भाजून घ्या. हवं असल्यास वरुन तूप घाला. पावडर लालसर भाजल्यानंतर एका ताटात काढा. त्यात चिरलेला गूळ भाजलेले मखाने, खरबुजाच्या बिया , सुके खोबरे घालून मिश्रण एकजीव करा आणि पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घ्या.
4. आता या मिश्रणात थोडेसे सुके खोबरे, भाजलेले ड्रायफुट्स, वेलची पावडर घालून मिक्स करा. नंतर हाताने गोल गरगरीत लाडू वळवा.
