Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाचा कडाका आणखी वाढणार! उष्माघाताचा त्रास टाळणारे 'हे' पदार्थ आताच घरात आणून ठेवा

उन्हाचा कडाका आणखी वाढणार! उष्माघाताचा त्रास टाळणारे 'हे' पदार्थ आताच घरात आणून ठेवा

Food That Saves us From Heat Stroke: उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच असणारे काही पदार्थ नियमितपणे खायला आताच सुरुवात करा...(food that helps to reduce heat in body)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2026 18:17 IST2026-04-16T18:16:18+5:302026-04-16T18:17:16+5:30

Food That Saves us From Heat Stroke: उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच असणारे काही पदार्थ नियमितपणे खायला आताच सुरुवात करा...(food that helps to reduce heat in body)

food that helps to reduce heat in body, food that saves us from heatstroke, how to keep body cool in hot summer | उन्हाचा कडाका आणखी वाढणार! उष्माघाताचा त्रास टाळणारे 'हे' पदार्थ आताच घरात आणून ठेवा

उन्हाचा कडाका आणखी वाढणार! उष्माघाताचा त्रास टाळणारे 'हे' पदार्थ आताच घरात आणून ठेवा

Highlights उन्हाळ्यात कित्येक जणांना जळजळ होते, पोटात आग पडल्यासारखी वाटते. हा त्रास टाळायचा असेल तर....

पाऊस पडल्याने मागच्या काही दिवसांत वातावरण थंड झाले होते. पण त्यानंतर मागच्या १५- २० दिवसांपासून आपण तापमानात रोजचीच वाढ अनुभवत आहोत. आता तर कित्येक ठिकाणी तापमान ४० डिग्रीच्या पुढे गेले आहे. उन्हामुळे जीव अगदी नकोसा होत आहे. त्यातच हा कडाका पुढच्या काही दिवसांत आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येतं. अशा परिस्थितीत उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तो टाळायचा असेल तर शरीर थंड ठेवणं गरजेचं आहे (Food That Saves us From Heat Stroke). त्यासाठी पुढे सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे तुमच्या आहारात असू द्या. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा...(food that helps to reduce heat in body)

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवे?

 

१. सब्जा

सब्जाच्या छोट्याशा बियांमध्ये मोठीच जादू असते. शरीर थंड ठेवण्यासाठी, शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी सब्जा अतिशय उपयुक्त ठरतो.

कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

रोज रात्री झोपण्यापुर्वी सब्जा पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या. किंवा कोशिंबीर, दही, सरबत, मिल्कशेक यांच्यामध्ये घालूनही तुम्ही सब्जा खाऊ शकता.

 

२. ताक 

शरीर थंड ठेवण्यासाठी रोज अर्धा ते एक ग्लास ताक पिणंही खूप गरजेचं आहे. ताक नियमितपणे प्यायल्यास शरीर थंड राहण्यास तर मदत होतेच, पण अन्नपचनही चांगलं होतं.

उन्हाळ्यात नुसतेच स्टायलिश गॉगल उपयोगाचे नाही; ४ गोष्टी पाहूनच करा खरेदी, नाहीतर डोळ्यांचं नुकसानच

कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. ताकामध्ये थोडं मीठ किंवा साखर घालून प्या. त्यामुळे त्याचे अधिक फायदे मिळतात.

 

३. कोकम सरबत

कोकम सरबत किंवा आमसुलाचे सार हे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या. या दिवसांत अंगातली उष्णता कमी करून शरीर थंड ठेवण्यासाठी हे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात. उन्हाळ्यात कित्येक जणांना जळजळ होते, पोटात आग पडल्यासारखी वाटते. हा त्रास टाळायचा असेल तर कोकम सरबत प्यायला हवं. 

 

Web Title : गर्मी को मात दें: इन प्राकृतिक शीतकों को अभी अपने आहार में शामिल करें!

Web Summary : बढ़ते तापमान के साथ, अपने शरीर को ठंडा करके हीटस्ट्रोक से बचें। अपने आहार में सब्जा के बीज, छाछ और कोकम जूस शामिल करें। ये खाद्य पदार्थ शरीर की गर्मी को कम करने और गर्मियों में आपको तरोताजा रखने में मदद करते हैं।

Web Title : Beat the Heat: Natural Coolants to Include in Your Diet Now!

Web Summary : With rising temperatures, prevent heatstroke by cooling your body. Include sabja seeds, buttermilk, and kokum juice in your diet. These foods help reduce body heat and keep you refreshed during summer.