Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

How to Get Chilled Air From Cooler?: कुलरमध्ये जर तुम्ही पुढे सांगितलेले काही पदार्थ घातले तर त्याची हवा नक्कीच अतिशय गार येईल...(home hacks to get chilled air from cooler)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2026 15:59 IST2026-04-16T15:57:09+5:302026-04-16T15:59:11+5:30

How to Get Chilled Air From Cooler?: कुलरमध्ये जर तुम्ही पुढे सांगितलेले काही पदार्थ घातले तर त्याची हवा नक्कीच अतिशय गार येईल...(home hacks to get chilled air from cooler)

how to get chilled air from cooler, home hacks to get chilled air from cooler  | कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

कुलरची गार हवा कमी आणि आवाजच जास्त? ५ रुपयांचे पदार्थ कुलरमध्ये घाला- खोली होईल एसीपेक्षा गार

उन्हाळ्याचा कडाका आता प्रचंड वाढलेला आहे. पंखा, कुलर न लावता तर आता अगदी सकाळीही बसणं शक्य नाही. कारण तेव्हाही खूप उष्णता असते. उष्णता वाढल्यानंतर आपण साहजिकतच पंखा किंवा कुलर लावतो. कारण एसीची गार हवा सगळ्यांनाच परवडणारी नाही. कुलर लावल्यानंतर थोडा वेळ खोली थंड होते, पण नंतर पुन्हा उष्णता जाणवू लागते. असं होऊ नये आणि तासनतास कुलरमधून थंडगार हवा यावी यासाठी पुढे सांगितलेले काही सोपे उपाय करून पाहा. हे उपाय केल्यामुळे खोली नक्कीच जास्त वेळ थंड राहण्यास मदत होईल.(home hacks to get chilled air from cooler)

 

कुलरमधून थंडगार हवा येण्यासाठी टिप्स

१. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे १ वाटी भरून मीठ घ्या आणि तेवढेच बर्फाचे तुकडे घ्या. कुलरच्या ट्रेमध्ये पाणी भरून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ घाला. नंतर त्यात बर्फाचे तुकडे घाला. आता बर्फाच्या तुकड्यांमुळे पाणी थंडगार होईल. शिवाय पाण्यात मीठ घातलेलं असल्याने बर्फ लवकर वितळणारही नाही. त्यामुळे बराच वेळ पाणी थंड राहिल्याने कुलरमधून गार हवा येत राहील. हा उपाय जर दिवसातून ३ ते ४ वेळा केला तर एसीची आठवणही येणार नाही.

 

२. दुसरा उपाय म्हणजे एक मोठा पसरट आकाराचा टब घ्या. त्यामध्ये पाणी भरा. त्यातही थोडेे मीठ आणि बर्फ टाकून ठेवा. हा टब कुलरच्या पंख्याच्या अगदी समोर त्याला समांतर असा ठेवा. यामुळे कुलरमधून जी हवा निघेल तिला पुन्हा बर्फाचा गारवा लागेल आणि खोली जास्त गार होईल.

३. ज्या खोलीमध्ये कुलर आहे तिथे क्रॉस व्हेंटिलेशन जास्त गरजेचं आहे. खिडकीच्या समोर तर कुलर ठेवाच, पण त्याच्या समाेरच्या बाजुने असणारी दुसरी खिडकी किंवा दरवाजाही उघडा ठेवा. जेणेकरून उष्ण हवा खोलीच्या बाहेर जाईल आणि खोली थंड राहण्यास मदत होईल. 


 

Web Title : कूलर से ठंडी हवा नहीं आ रही? एसी जैसी हवा के लिए ये उपाय करें

Web Summary : गर्मी से राहत! अतिरिक्त ठंडक के लिए कूलर में नमक और बर्फ डालें। सामने बर्फ के पानी का टब रखें। बेहतर शीतलन के लिए क्रॉस-वेंटिलेशन सुनिश्चित करें। ठंडी हवा के लिए सरल उपाय।

Web Title : Cooler Not Cooling? Use These Simple Tricks for AC-Like Air

Web Summary : Beat the heat! Add salt and ice to your cooler for extra chill. Place a tub of ice water in front. Ensure cross-ventilation for optimal cooling. Simple tricks for cool air.