Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ना ओव्हन- ना मायक्रोव्हेव, कुकरमध्ये करा बेकरीसारखा मऊ लादी पाव, ३० मिनिटांत होईल - पाहा परफेक्ट प्रमाण

ना ओव्हन- ना मायक्रोव्हेव, कुकरमध्ये करा बेकरीसारखा मऊ लादी पाव, ३० मिनिटांत होईल - पाहा परफेक्ट प्रमाण

No oven no microwave bread recipe: Soft and spongy ladi pav tips: Quick 30 minute ladi pav recipe: मिनी लादी पाव घरच्या घरी कसे बनवायचे, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2026 09:30 IST2026-04-25T09:30:00+5:302026-04-25T09:30:03+5:30

No oven no microwave bread recipe: Soft and spongy ladi pav tips: Quick 30 minute ladi pav recipe: मिनी लादी पाव घरच्या घरी कसे बनवायचे, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

Eggless ladi pav recipe in pressure cooker Homemade dinner rolls without oven How to make soft pav at home Bakery style ladi pav in cooker Pressure cooker baking recipes | ना ओव्हन- ना मायक्रोव्हेव, कुकरमध्ये करा बेकरीसारखा मऊ लादी पाव, ३० मिनिटांत होईल - पाहा परफेक्ट प्रमाण

ना ओव्हन- ना मायक्रोव्हेव, कुकरमध्ये करा बेकरीसारखा मऊ लादी पाव, ३० मिनिटांत होईल - पाहा परफेक्ट प्रमाण

पावभाजी असो किंवा वडापाव, मऊ आणि लुसलुशीत लादी पाव असेल तर जेवणाची चव दुप्पट होते. अनेकदा आपल्याला वाटतं की बेकरीसारखे जाळीदार आणि कापसासारखे मऊ पाव फक्त ओव्हनमध्येच बनवता येतात.(No oven no microwave bread recipe) पण आपल्या घरातील साध्या प्रेशर कुकरमध्येही ओव्हनसारखेच परफेक्ट लादीपाव बनवता येतील. जर आपल्याकडे ओव्हन किंवा मायक्रोव्हेव नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे. (Soft and spongy ladi pav tips)
घरच्या घरी पाव बनवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्हज नाही. अगदी ३० मिनिटांत सोप्या पद्धतीने पाव कसे बनवायचे पाहूया. इंस्टाग्रामवरील कुकिंग विथ अनिता या पेजवरुन ही रेसिपी शेअर करण्यात आली. हे मिनी लादी पाव घरच्या घरी कसे बनवायचे पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा. (Quick 30 minute ladi pav recipe)

उन्हाळा वाळवण स्पेशल: जेवणाची रंगत वाढवणारी चटपटीत मसाला कैरी! एक थेंब तेलही न वापरता टिकेल वर्षभर- पाहा सोपी रेसिपी

साहित्य 

कोमट दूध - अर्धा कप आणि ३/४ कप
साखर - १ चमचा
यीस्ट - १ चमचा
मैदा - २ कप 
मीठ - १/४ चमचा
बटर - १ चमचा

कृती 

1. सगळ्यात आधी कोमट दुधात साखर आणि ड्राय यीस्ट नीट मिसळून घ्या. हे मिश्रण १० मिनिटांसाठी झाकून ठेवा. जोपर्यंत मिश्रणावर फेस येत नाही तोपर्यंत झाकून ठेवा. फेस आला की समजावे यीस्ट सक्रिय झाले आहे. 

2. आता एका मोठ्या भांड्यात मैदा, चवीनुसार मीठ आणि बटर एकत्र करा. त्यानंतर आता त्यात तयार यीस्टचे मिश्रण घाला. वरुन उरलेले पाऊण कप कोमट दूध थोडे-थोडे पिठात घालून मऊ-लवचिक गोळा मळून घ्या. पीठ जेवढे चांगले मळाल, तेवढे पाव जाळीदार होतील. 

3. मळलेल्या पिठाच्या गोळ्याला थोडे तेल किंवा बटर लावून परत टीनमध्ये ठेवा. हे टीन कापडाने झाकून साधारण १ तास उबदार जागी ठेवा. ज्यामुळे पीठ फुगण्यास मदत होईल. 

4. पीठ फुगल्यानंतर त्याचे छोटे- छोटे गोळे करा. कुकरच्या डब्यात बटर पेपर लावून किंवा तेल लावून हे गोळे थोडे अंतर ठेवून ठेवा. त्यावर ओला सुती कापड ठेवून पुन्हा ३० मिनिटे ठेवा. यामुळे पाव छान फुलतील. 

5. बेकिंगला ठेवण्यापूर्वी पावाच्या गोळ्यांवर ब्रशने थोडे दूध लावा, यामुळे पावाचा वरचा रंग छान येईल. कुकरमध्ये तळाला मीठ घालून त्यात स्टँड ठेवा. १० मिनिटे प्री-हीट होण्यास ठेवा. पावाचा डबा कुकरमध्ये ठेवून वरुन झाकण लावा. कुकरची शिट्टी आणि रबर काढून टाका. मंद आचेवर ३० मिनिटे पाव बेक होऊ द्या. पाव थंड झाल्यानंतर वरुन बटर आणि कोथिंबीर लावून खा.  



Web Title : कुकर में बनाएं बेकरी जैसे लादी पाव, ओवन/माइक्रोवेव की जरूरत नहीं

Web Summary : अब कुकर में 30 मिनट में बेकरी जैसे लादी पाव बनाएं! यह आसान रेसिपी घर पर उपलब्ध सामग्री का उपयोग करती है। बिना प्रिजर्वेटिव के घर पर नरम, स्पंजी पाव बनाना सीखें, जो पाव भाजी या वड़ा पाव के लिए एकदम सही हैं।

Web Title : Easy cooker recipe: Make soft Ladi Pav without oven/microwave at home.

Web Summary : Make bakery-style Ladi Pav in a cooker in 30 minutes! This simple recipe uses readily available ingredients. Learn how to make soft, spongy pavs at home without preservatives, perfect for pav bhaji or vada pav.