Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कुकरमें कढी चावल, शेफ रणबीर ब्रार यांची रेसिपी! चमचमीत कढीभात कुकरमध्ये करण्याची युक्ती

कुकरमें कढी चावल, शेफ रणबीर ब्रार यांची रेसिपी! चमचमीत कढीभात कुकरमध्ये करण्याची युक्ती

Chef Ranbir Brar's recipe! one pot recipe for summers, make kadhi chawal in cooker : कढीभात करण्याची भन्नाट रेसिपी. पाहा भारी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 15:43 IST2026-04-30T15:42:34+5:302026-04-30T15:43:31+5:30

Chef Ranbir Brar's recipe! one pot recipe for summers, make kadhi chawal in cooker : कढीभात करण्याची भन्नाट रेसिपी. पाहा भारी रेसिपी.

Chef Ranbir Brar's recipe! one pot recipe for summers, make kadhi chawal in cooker | कुकरमें कढी चावल, शेफ रणबीर ब्रार यांची रेसिपी! चमचमीत कढीभात कुकरमध्ये करण्याची युक्ती

कुकरमें कढी चावल, शेफ रणबीर ब्रार यांची रेसिपी! चमचमीत कढीभात कुकरमध्ये करण्याची युक्ती

मस्त चविष्ट अशा विविध रेसिपी करायलाच हव्यात .सोप्या आणि झटपट होणार्‍या रेसिपी अनेक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वन पॉट कढी भात. आपण भात वेगळा आणि कढी वेगळी असं नेहमीच बनवतो. मात्र एकदा या पद्धतीनेही करुन पाहा. कढीतच भात शिजवायचा. ( Chef Ranbir Brar's recipe!  one pot recipe for summers, make kadhi chawal in cooker )चवीला वेगळा मात्र भारी असा हा पदार्थ आहे. सुप्रसिध्द शेफ रणबीर ब्रार यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत ही कुकरमें कढी चावल रेसिपी सांगितली आहे.

साहित्य 
तांदूळ, बेसन, कांदा, पाणी, मेथी दाणे, तेल, हिंग, धणे, जिरे, कडीपत्ता, बडीशेप, दही, लाल तिखट, कसुरी मेथी, आमचूर, हळद, मीठ, गरम मसाला, आलं, लसूण, हिरवी मिरची, कलोंजी 

कृती
१. एका पातेल्यात थोडे तांदूळ घ्यायचे. धुवायचे आणि थोडावेळ तसेच ठेवायचे. एका खोलगट भांड्यात थोडं बेसन घ्यायचं. त्यात थोडी हळद घालायची. तसेच मीठ घालायचे. गरम मसाला घालायचा. लाल तिखट घालायचे. थोडी आमचूर पावडर घालायची. थोडी कसुरी मेथी घालायची. दही घालायचे आणि मग  त्यात पाणी ओतायचे, पातळ मिश्रण तयार करायचे. दही आणि बेसन छान एकजीव करायचे.  

२. हिरवी मिरची बारीक चिरुन घ्यायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याचे बारीक तुकडे करायचे. आल्याचा तुकडा घ्यायचा. सगळं बारीक चिरुन किंवा ठेचून घ्यायचं. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. एका कुकरमध्ये थोडं तेल घ्यायचं. त्यात हिंग घालायचं. तसेच धणे, जिरे, कलोंजी, मेथी दाणे हे सगळे पदार्थ घालायचे आणि छान परतायचे. थोडी बडीशेपही घालायची. 

३. परतून झाल्यावर त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालायची. ते ही मस्त परतून घ्यायचे. कांदा घालायचा खमंग परतायचा. कांदा गुलाबी झाला की त्यात बेसनाचे मिश्रण त्यात ओतायचे. त्याला उकळी येऊ द्यायची. कढी तयार झाली की धुतलेले तांदूळ त्यात घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि कुकरचे झाकण लावायचे.  

Web Title : कुकर में कढ़ी चावल: शेफ रणबीर ब्रार की झटपट रेसिपी

Web Summary : शेफ रणबीर ब्रार ने कुकर में कढ़ी चावल बनाने की झटपट रेसिपी साझा की। यह एक बर्तन में बनने वाला व्यंजन चावल और कढ़ी को मिलाकर स्वादिष्ट भोजन बनाता है। मसाले भूनें, दही-बेसन का मिश्रण डालें, फिर चावल। आसान और स्वादिष्ट परिणाम के लिए प्रेशर कुक करें।

Web Title : One-Pot Kadhi Chawal Recipe: Chef Ranbir Brar's Quick Cooker Method

Web Summary : Chef Ranbir Brar shares his quick cooker Kadhi Chawal recipe. This one-pot dish combines rice and Kadhi for a flavorful meal. Sauté spices, add a yogurt-besan mixture, then rice. Pressure cook for a simple, delicious result.