Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पीठ न मळता-न लाटता चपात्या करण्याची ट्रिक, उन्हाळ्यासाठी झटपट उपाय-भरभर काम

पीठ न मळता-न लाटता चपात्या करण्याची ट्रिक, उन्हाळ्यासाठी झटपट उपाय-भरभर काम

Chapati Recipe No Knead No Roll Soft Roti Easy Recipe : ही पद्धत खूपच खास आणि परफेक्ट आहे जे लोक कुकिंगमध्ये नवीन आहे किंवा ज्यांना लवकर काम संपवायचं आहे त्यासाठी ही पद्धत उत्तम ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:28 IST2026-04-28T13:34:34+5:302026-04-28T16:28:31+5:30

Chapati Recipe No Knead No Roll Soft Roti Easy Recipe : ही पद्धत खूपच खास आणि परफेक्ट आहे जे लोक कुकिंगमध्ये नवीन आहे किंवा ज्यांना लवकर काम संपवायचं आहे त्यासाठी ही पद्धत उत्तम ठरते.

A special trick to make chapatis without kneading or rolling the dough | पीठ न मळता-न लाटता चपात्या करण्याची ट्रिक, उन्हाळ्यासाठी झटपट उपाय-भरभर काम

पीठ न मळता-न लाटता चपात्या करण्याची ट्रिक, उन्हाळ्यासाठी झटपट उपाय-भरभर काम

आजच्या व्यस्त जीवनशैलीत कोणाकडेही इतका वेळ नसतो की आरामात तासनतास किचनमध्ये वेळ घालवता येईल. सकाळी घाईच्यावेळी किंवा ऑफिसवरून घरी आल्यानंतर चपात्यांची कणीक मळणं, चपात्या लाटणं इतकावेळ कोणाकडेही नसतो. चपात्या करणं हे काम एखाद्या टास्कप्रमाणे वाटतं. ज्यामुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. पण हे त्रास टाळण्यासाठी तुम्ही १ सोपी युक्ती वापरू शकता. ज्यात तुम्हाला पीठ मळावं लागणार नाही, ना लाटणं उचलावं लागणार. फक्त एक पातळ मिश्रण तयार करायचं आहे. (Chapati Recipe No Knead No Roll Soft Roti Easy Recipe)

विशेष म्हणजे या पद्धतीनं केलेल्या चपात्या लाटून केलेल्या चपात्यांप्रमाणेच टम्म फुगतात आणि बराचवेळ मऊसुद्धा राहतात. तुम्हालाही किचनमधला वेळ वाचवायचा असेल आणि पटकन स्वंयपाक करायचा असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. (Chapati Recipe No Knead No Roll Soft Roti Easy Recipe)

 चपाती करण्याची सोपी पद्धत कोणती?

ही पद्धत खूपच खास आणि परफेक्ट आहे जे लोक स्वयंपाकात नवशिके आहेत किंवा ज्यांना लवकर काम संपवायचं आहे त्यासाठी ही पद्धत उत्तम ठरते. गव्हाच्या पिठाच्या पिठात पाणी मिसळून एक पातळ मिश्रण तयार करा. हे मिश्रण जास्त पातळ असू नये किंवा जास्त घट्टही असू नये. हे मिश्रण तव्यावर पसरवून घ्या. याला नो नीड आणि नो रोल टेक्निकही म्हणतात.

हे मिश्रण तयार करण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी एका मिक्सिंग बाऊलमध्ये १ कप गव्हाचं पीठ घ्या. त्यात थोडं बेसन मिसळा जेणेकरून टेक्स्चर चांगले येईल आणि चवही चांगली लागेल. यात चवीनुसार मीठ घाला तुम्हाला चपाती जास्त मऊ हवी असेल तर तुम्ही यात १ चमचा तेलसुद्धा मिसळू शकता, हळूहळू पाणी घाला. एक पातळ आणि गाठी नसलेलं मिश्रण तयार करा. हे मिश्रण तव्यावर सहज पसरेल इतकं पातळ असावं.

तव्यावर चपाती पसरवण्याची योग्य पद्धत

हे मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच वापरू नका. १० ते १५ मिनिटांसाठी तसंच ठेवा. ही स्टेप खूप गरजेची आहे. कारण यामुळे पीठ पाणी नीट शोषून  घेते. जेव्हा तुम्ही १५ मिनिटांनी पुन्हा हे पीठ वापराल तेव्हा ते घट्ट आणि स्मूथ आणि लवचीक बनेल. ज्यामुळे चपाती फाटत नाही आणि व्यवस्थित शिजेल.

तवा गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर ठेवा. तवा जास्त गरम असू नये. अन्यथा चपाती जास्त शिजते किंवा आतून कच्ची राहते. नंतर एका चमच्याच्या मदतीनं थोडं मिश्रण तव्यावर गोल गोल पसरवा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती पातळ किंवा थोडी जाड बनवू शकता.

चपाती शिजवण्याची आणि उलटण्याची योग्य पद्धत

 जेव्हा चपाती वरून शिजलेली दिसेल तेव्हा तव्यावर पलटी करून दुसऱ्या बाजूनंही व्यवस्थित शेकून घ्या. चपाती शिजल्यानंतर कापडानं हलका दबाव द्या.  ज्यामुळे चपातीची वाफ व्यवस्थित राहील आणि चपाती मऊ होईल.

चपाती गॅसवर फुगवण्याची सोपी पद्धत

 जेव्हा चपाती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजेल तेव्हा पलटून थेट आचेवर ठेवा. तुम्हाला दिसेल की चपाती फुग्याप्रमाणे व्यवस्थित फुगली आहे. या पद्धतीनं बनवलेल्या चपात्या मऊ राहतात.

जेव्हा तुम्हाला किचनचं काम लवकर आवरायचं असेल तेव्हा ही ट्रिक वापरा. यामुळे फक्त वेळेची बचत होणार नाही तर कमी मेहनतीत जास्त काम होईल. खासकरून विद्यार्थी, बॅचलर आणि कामाला जाणाऱ्या लोकांसाठी ही एक टाईम सेव्हर ट्रिक ठरू शकते. 

Web Title : बिना आटा गूंथे, बिना बेले चपाती: 10 मिनट में बनाएं!

Web Summary : आसान चपाती रेसिपी से समय बचाएं! आटा गूंथना और बेलना छोड़ें, नरम, फूली हुई रोटियों के लिए घोल का उपयोग करें। व्यस्त कार्यक्रम के लिए बिल्कुल सही।

Web Title : No-knead, no-roll chapati recipe: Soft rotis in 10 minutes!

Web Summary : Save time with this easy chapati recipe! Skip kneading and rolling, use a simple batter for soft, puffed rotis. Perfect for busy schedules.