कॉटनच्या साड्या नेसल्या की आपल्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक येते. त्यामुळे कित्येक जणी आवर्जुन कॉटनच्या साड्या नेसण्यास प्राधान्य देतात. ऑफिसमध्ये एखादी महत्त्वाची मीटिंग असेल किंवा कार्यक्रम असेल तर वर्किंग वुमनही कॉटन साड्या नेसतात. कारण त्यामुळे खूप छान फॉर्मल लुक मिळतो. सध्या तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने कॉटनच्या साड्या अतिशय आरामदायी वाटतात. त्यामुळे तुम्हीही कॉटन साडी नेसत असाल पण ती मेंटेन करायला कठीण वाटत असेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवा. यामुळे कॉटन साडी लवकर चुरगळणारही नाही आणि पुढे बरीच वर्षे ती अगदी फ्रेश नव्यासारखे दिसेल.(How to Maintain Cotton Saree?)
कॉटन साडी मेंटेन करण्यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स
१. कॉटन साडी चुरगळू नये किंवा धुतल्यानंतर कडक होऊ नये म्हणून ती नेहमी सॉफ्ट स्टार्च किंवा लिक्विड स्टार्च वापरून धुवावी.
अधिक मासात जावयाला देण्यासाठी नव्या पद्धतीच्या सुंदर निरांजन, पाहा एकाहून एक देखणे ९ दिवे
२. कॉटन साडी धुण्यासाठी कधीही कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करू नका. थंड पाण्यात कॉटन साडी धुतल्याने तिचा कलर जात नाही.
३. कॉटन साडी कधीही खूप जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नये. ८ ते १० मिनिटे त्यासाठी पुरेशी आहेत.
४. धुतलेले कपडे आपण खूप जोर लावून पिळतो. तसं कॉटनच्या साडीच्या बाबतीत करू नये. ही साडी हलक्या हाताने पिळावी. ५- ६ वेळेस झटकून घ्यावी आणि नंतर सावलीत वाळत घालावी.
Adhik Maas 2026: अधिक महिन्यात आजी- आई देवासमोर काढायच्या अशी पारंपरिक रांगोळी, तुम्हीही काढून पाहा
५. इस्त्री करताना इस्त्री जास्त गरम तर झालेली नाही ना याकडे नेहमी लक्ष द्यावे. शिवाय इस्त्री झाल्यानंतर साडीची लगेच घडी घालून ती कपाटात ठेवू नये. थोडावेळ साडी बाहेरच राहू द्यावी आणि नंतर कपाटात ठेवावी.
६. कॉटनची साडी नेहमी एखाद्या मऊ कॉटनच्या कपड्यात किंवा मलमलच्या कपड्यात गुंडाळूनच कपाटात ठेवावी. जेणेकरून ती जास्त दिवस छान राहते.
