Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Celebrity Corner > ‘ऊ गधा ना होला..!’ -मनोज वाजपेयी सांगतो आईने सल्ला दिला म्हणून पाय जमिनीवर! ‘फॅमिली मॅन’चं बदललं आयुष्य

‘ऊ गधा ना होला..!’ -मनोज वाजपेयी सांगतो आईने सल्ला दिला म्हणून पाय जमिनीवर! ‘फॅमिली मॅन’चं बदललं आयुष्य

Manoj Bajpayee shares his mother's advise which changed his life , inspirational quotes : मनोज वाजपायीच्या आईने दिला खास सल्ला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 17:44 IST2026-04-24T17:37:02+5:302026-04-24T17:44:07+5:30

Manoj Bajpayee shares his mother's advise which changed his life , inspirational quotes : मनोज वाजपायीच्या आईने दिला खास सल्ला.

Manoj Bajpayee shares his mother's advise which changed his life , inspirational quotes | ‘ऊ गधा ना होला..!’ -मनोज वाजपेयी सांगतो आईने सल्ला दिला म्हणून पाय जमिनीवर! ‘फॅमिली मॅन’चं बदललं आयुष्य

‘ऊ गधा ना होला..!’ -मनोज वाजपेयी सांगतो आईने सल्ला दिला म्हणून पाय जमिनीवर! ‘फॅमिली मॅन’चं बदललं आयुष्य

आजच्या काळात मनोज वाजपेयी हे नाव फक्त थोड्या प्रसिद्धीपुरतं नाही, तर अभिनयातील प्रामाणिकपणा, संघर्ष आणि दर्जेदार कामासाठी ओळखलं जातं. बॉलिवूडमध्ये स्टारडम अनेकांना मिळतं, पण 'अभिनेता' म्हणून जो मान मिळतो तो मनोज वाजपेयीने नक्कीच मिळवला आहे. ( Manoj Bajpayee shares his mother's advise which changed his life , inspirational quotes)त्यांच्या प्रत्येक भूमिकेकडे लोक फक्त मनोरंजन म्हणून नाही, तर एक अनुभव म्हणून पाहतात.

पण हा मान, ही ओळख एका दिवसात मिळालेली नाही. बिहारमधल्या छोट्या गावातून मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. सुरुवातीच्या काळात काम नव्हतं, पैसे नव्हते, आणि पुढे काय होणार याची काहीच खात्री नव्हती. स्वतः त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की, मुंबईत आलेल्या पहिल्या काही वर्षांत परिस्थिती इतकी कठीण होती की पुढचं जेवण कुठून येईल याचीही कल्पना नसायची.

अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. सत्या मधील 'भीकू म्हात्रे' या भूमिकेने त्यांना मोठी ओळख मिळाली, आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. शूल, गँग्स ऑफ वासेपूर, द फॅमिली मॅन अशा भूमिकांनी मनोज वाजपेयी हे नाव जगभरात लोकप्रिय ठरलं.  या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम त्यांच्यासोबत राहिली ती म्हणजे त्यांची आई. त्यांच्या आईचे शब्द. ललनटॉपसोबतच्या एका मुलाखतीत संवाद साधताना त्यांनी हा प्रसंग सांगितला होता. आईने त्यांना एक साधं पण खोल अर्थ असलेलं वाक्य सांगितलं होतं ज्या वाक्याने त्यांना आयुष्यात कधीच घमंडी नाही होऊ दिलं.   

त्यांच्या आईचं वाक्य 'जेकरा ऊ सब नइखे मिलल, जे तोहरा मिलल बा, ऊ गधा ना होला.' असं होतं. या भोजपुरीमधील वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे. मनोज वाजपेयींच्या आईने त्यांना सांगितलं, "तू यशस्वी झालास याचा अर्थ जो झाला नाही तो मूर्ख असा कधीच समजू नकोस." अपयशी माणूस मूर्ख असतो ही भावना मनात येऊ नये. आयुष्यात सगळं काही सगळ्यांना मिळत नाही, पण जे काही आपल्याला मिळालं आहे त्याची कदर न करणं म्हणजे मूर्खपणा. म्हणजेच, तुलना करत बसण्यापेक्षा स्वतःकडे असलेल्या गोष्टींचं मूल्य ओळखणं हेच खरं शहाणपण.

मनोज वाजपेयी यांच्या करिअरकडे पाहिलं तर हे वाक्य अगदी स्पष्ट दिसतं. त्यांनी कधीही इतरांसारखं स्टारडम मिळवण्याचा अट्टाहास केला नाही, तर जे रोल मिळाले त्यात प्रामाणिकपणे काम केलं. म्हणूनच कदाचित ते आज 'मास हिरो' नसले तरी 'क्लास अभिनेता' म्हणून प्रेक्षकांच्या मनात कायमचे बसले आहेत. 

Web Title : मनोज वाजपेयी: माँ की सलाह ने 'फैमिली मैन' की सफलता के बावजूद ज़मीन से जोड़े रखा।

Web Summary : मनोज वाजपेयी अपनी विनम्रता का श्रेय अपनी माँ की बुद्धिमत्ता को देते हैं। उनके शब्दों, कृतज्ञता पर जोर देने और अहंकार से बचने ने, 'फैमिली मैन' जैसी भूमिकाओं से मिली प्रसिद्धि के बावजूद, सफलता के प्रति उनके ज़मीनी दृष्टिकोण को आकार दिया।

Web Title : Manoj Bajpayee: Mother's advice kept him grounded despite 'Family Man' success.

Web Summary : Manoj Bajpayee credits his mother's wisdom for his humility. Her words, emphasizing gratitude and avoiding arrogance, shaped his grounded approach to success despite fame from roles like 'Family Man'.