रविवारी नवी मुंबईत झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच जेतेपद पटकावत इतिहासात रचला. भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला.(Mandira Bedi women’s cricket) पण हे यश सहजासहजी भारतीय महिलांना मिळालं नाही.(Indian women cricket struggle story) चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.(Indian cricket inspiration) आपणही पुरुषांसारखं क्रिकेट खेळावं, देशाचं नाव मोठं करावं असं अनेकांच स्वप्न. (Mandira Bedi donation)
१९७३ साली भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन (WCAI)ची स्थापना झाली आणि २००६ मध्ये राष्ट्रीय संघ निवडला गेला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर महिला क्रिकेट टीमची जबाबदारी घेतली. खरंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची गोष्ट म्हणजे संघर्ष, स्वप्नं आणि असंख्य त्यागाची कहाणी. भारतीय क्रिकेट टीममधल्या खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत असल्या तरी काही वर्षांपूर्वीचा त्यांचा प्रवास अगदी कठीण होता. ना पुरेशी सुविधा, ना प्रायोजक, ना आर्थिक पाठबळ.. पण मनात आपल्या देशासाठी खेळण्याची फक्त जिद्द. अनेकदा परिस्थिती इतकी हालाखीची झाली की, खेळण्यासाठी संघाकडे पैसे नसायचे, त्यात बॅटही तीनच. पण तरीही न डगमगता, महिला आवडीने खेळत होत्या.
वर्ष वाईट गेलं, लोकांनी ट्रोल केलं, टिममधून डच्चू मिळाला पण ती खचली नाही! जेमिमाची ' अशीही' गोष्ट
या काळात WCAI कडून देखील महिलांना डावलण्यात आले होते. महिला क्रिकेट हा व्यावसायिक खेळ नाही. या क्षेत्रातून फारसे पैसे आयोजकांना मिळत नव्हते. आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी निधी उभारणं फार कठीण होतं. याबाबत सुनिल गावस्करांची बहीण नूतन यांनी सांगितलं. त्या म्हणतात, एकदा न्यूझीलंडचा दौरा होता जेव्हा आमच्याकडे हॉटेलमध्ये राहण्याचे देखील पैसे नव्हते. असं आमच्यासोबत अनेकदा झालं. पण या सगळ्यात पाठीशी उभी राहिली ती मंदिरा बेदी.
अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली मंदिरा फक्त पडद्यावरच नाही तर क्रिकेटच्या जगातही आदराने ओळखली जाते. त्या मॅचसाठी काँमेंट्री करत असत. त्यांनीच महिला क्रिकेट प्रेझेंटरचा ट्रेंड भारतात पहिल्यांदा सुरु केला. जवळपास दशकभरापूर्वी मंदिरा बेदी भारतीय महिला संघाचा एक सामना पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी होत्या शुभांगी कुलकर्णी. त्या सहज म्हणाल्या तुम्ही पुरुष क्रिकेट संघासाठी इतकं करता मग महिला क्रिकेट संघासाठी पाठबळ का देत नाही? त्यानंतर मंदिरा बेदी यांनी महिला क्रिकेट संघाला स्पॉन्सरशिप मिळवून देण्यासाठी खारीचा वाटा उचलला.
मंदिरा बेदी एका ज्वेलरी ब्रँडच्या ब्रँड अम्बॅसिडोर होत्या. त्यांनी या जाहिरातीतून मिळालेले पैसे महिला क्रिकेट संघाला स्पॉन्सरशिप म्हणून दिले. अस्मी (Asmi) हा ज्वेलरी ब्रँडने भारतीय महिला क्रिकेट संघाला स्पॉन्सरशिप दिली. त्यांनी २००३ ते २००५ पर्यंत स्पॉन्सर मिळवून दिला. हे पाऊल जेव्हा त्यांनी उचललं ते केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर त्यांच्या मनात असलेल्या त्या खेळाडूविषयीच्या प्रेमासाठी.
