Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > पार्लरमध्ये ५००० रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट - असा दह्याचा हेअर स्पा केस करतो सुंदर

पार्लरमध्ये ५००० रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट - असा दह्याचा हेअर स्पा केस करतो सुंदर

keratin mask for silky hair: Benefits of curd for hair dandruff: घरच्या घरी अगदी कमी खर्चात पार्लरसारखा लुक कसा मिळवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2026 15:43 IST2026-04-19T15:42:49+5:302026-04-19T15:43:19+5:30

keratin mask for silky hair: Benefits of curd for hair dandruff: घरच्या घरी अगदी कमी खर्चात पार्लरसारखा लुक कसा मिळवायचा पाहूया.

Instead of spending Rs. 5000 at a parlor, get a keratin treatment at home Natural keratin treatment at home Curd hair mask for dry and frizzy hair Homemade protein hair mask for hair growth How to do hair spa at home naturally | पार्लरमध्ये ५००० रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट - असा दह्याचा हेअर स्पा केस करतो सुंदर

पार्लरमध्ये ५००० रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट - असा दह्याचा हेअर स्पा केस करतो सुंदर

सध्याच्या फॅशनच्या युगात प्रत्येकाला सुंदर, लांबसडक आणि रेशमी केस हवे असतात. सततचे धूळ, प्रदूषण, उन्हाचा तडाखा आणि शाम्पू-कंडिशनरमधील घातक रसायनांमुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात.(hair care tips) यावर उपाय म्हणून अनेकजण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा किंवा केराटिन ट्रिटमेंट करतात. या ट्रिटमेंटसाठी एका वेळेला आपल्याला ५००० ते १० हजारांचा खर्च येतो, जो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसतो.(hair care routine) या रायानिक प्रक्रियांचे परिणाम काही काळापुरतेच मर्यादित असतात. (keratin mask for silky hair)
केसांना प्रोटीन ग्लो देण्यासाठी आपण पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतो पण हाच ग्लो आपल्या यंपाकघरातील नैसर्गिक गोष्टींचा वापर करून मिळवू शकता.(Home remedies for shiny and smooth hair) दह्यात काही पदार्थ मिसळून आपण प्रोटीन हेअर मास्क तयार करु शकतो. हा मास्क केवळ केसांना चमक देत नाही, तर तो केसांच्या मुळाशी जाऊन त्यांचे पोषण करतो, कोंडा दूर करतो आणि केस गळती रोखतो. घरच्या घरी अगदी कमी खर्चात पार्लरसारखा लुक कसा मिळवायचा पाहूया. 

मसूर डाळीचा स्क्रब 'या' पद्धतीने लावा, डेडस्किन- टॅनिंग होईल दूर, १५ मिनिटांत मिळेल पार्लरसारखा इंस्टंट ग्लो

प्रोटीन हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

दही - ४ मोठे चमचे
अंडी - १ 
खोबरेल तेल - २ ते ३ चमचे
मध - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी स्वच्छ वाटीमध्ये ४ चमचे दही घ्या. त्यात एक अंडे फोडून घाला. जर अंड्याचा वास आवडत नसेल तर त्यात काही थेंब लिंबाचा रस किंवा इसेन्शियल ऑइल घाला. त्यात २ ते ३ चमचे खोबऱ्याचे तेल घाला. १ चमचा मध घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. ही पेस्ट स्मूथ होईपर्यंत फेटा, जेणेकरून ती केसांना लावणे सोपे होईल.

2. मास्क लावण्यापूर्वी केसांमधील गुंता काढून टाका. हा मास्क केसांच्या मुळांशी आणि संपूर्ण लांबीवर व्यवस्थित लावा. ब्रश किंवा बोटांच्या मदतीने हलका मसाज करा. हा मास्क साधरण ३० ते ४५ मिनिटे केसांवर राहू द्या. केस सुकू नयेत म्हणून शावर कॅप वापरु शकता. केस धुताना कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा. कडक गरम पाणी वापरल्यास अंड्याचा वास केसात राहू शकतो. त्यानंतर शाम्पूने केस धुवा. 

3. अंड्यातील प्रोटीन आणि दह्यातील फॅट्समुळे केसांना नैसर्गिक केराटिन मिळते, ज्यामुळे केस सरळ आणि मऊ होतात. दह्यातील बॅक्टेरिया केसातील कोंडा कमी करण्यास मदत करतात. 
 


Web Title : घर पर केराटिन ट्रीटमेंट: दही से पाएं खूबसूरत बाल!

Web Summary : महंगे पार्लर ट्रीटमेंट छोड़ें! यह घरेलू दही हेयर स्पा मास्क पोषण देता है, रूसी कम करता है और बालों का झड़ना रोकता है, जिससे आपको कम कीमत पर सैलून जैसा परिणाम मिलता है। आसान सामग्री, शानदार परिणाम।

Web Title : DIY Keratin Treatment: Get Gorgeous Hair at Home with Yogurt!

Web Summary : Skip expensive parlor treatments! This homemade yogurt hair spa mask nourishes, reduces dandruff, and prevents hair fall, giving you salon-like results at a fraction of the cost. Simple ingredients, stunning results.