अनेकदा आपण चेहऱ्याच्या सौंदर्याची खूप काळजी घेतो. पण त्या नादात मान आणि पाठीच्या त्वचेकडे दुर्लक्ष होते. कडक ऊन, प्रदूषण, घाम आणि मृत त्वचा साचल्यामुळे मानेवर आणि पाठीवर काळे थर जमा होतात. जेव्हा आपण बॅकलेस कपडे किंवा डीप नेकचे ड्रेसेस घालतो, तेव्हा हा काळपटपणा आपल्या सौंदर्यात बाधा ठरतो.(Best pack for whitening dark neck and back) हा काळेपणा घालवण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपयांचे ब्लीच किंवा महागड्या ट्रिटमेंट्स घेतात. पण ब्लीचमधील केमिकल्समुळे त्वचा तात्पुरती उजळली तरी नंतर ती अधिकच कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते. (Get glowing neck and back in 1 month with magic trick)
हा काळपटपणा किंवा 'टॅनिंग' घालवण्यासाठी बहुतांश महिला पार्लरची वाट धरतात. तिथे गेल्यानंतर 'ब्लीच' हा सर्वात सोपा आणि जलद मार्ग सुचवला जातो. यासाठी साधारणपणे ५०० ते १००० रुपये खर्च होतात. पण हा तात्पुरता उपाय आहे. ब्लीचमध्ये असलेल्या तीव्र रसायनांमुळे (Chemicals) त्वचेचा वरचा थर तात्पुरता उजळतो खरा, पण दीर्घकाळात ही रसायने त्वचेला अधिक काळवंडलेली आणि संवेदनशील बनवू शकतात. कोरडी त्वचा, खाज सुटणे किंवा पुरळ येणे यांसारखे दुष्परिणाम केमिकल ब्लीचमुळे होऊ शकतात.
उन्हाळ्यात प्या कूल- स्पाईसी ड्रिंक, ट्राय करा चटपटीत कोकम मॉकटेल- १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी
पार्लरमध्ये १००० रुपये खर्च करण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्या कोणत्याही साईड इफेक्टशिवाय त्वचेचा काळपटपणा स्वच्छ करतात. या नैसर्गिक उपायांमध्ये त्वचेला उजळवण्याचे आणि एक्सफोलिएट करण्याचे गुणधर्म असतात. जर आपण नियमितपणे काही घरगुती उपाय केल्यास महिन्याभरात आपल्याला फरक पाहायला मिळले. मानेचा आणि पाठीचा काळेपणा घालवणाऱ्या काही प्रभावी 'मॅजिक ट्रिक्स'.
1. मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी २ चमचे बेसन, १ चमचा दही आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करुन पेस्ट बनवा. ही पेस्ट मान आणि पाठीवर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. बेसन हे त्वचेवरील घाण काढण्यास मदत करते. तर दह्यात असणारे लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला नैसर्गिकरित्या ब्लीच करते.
2. बटाटा हा नैसर्गिक ब्लीचिंग एजंट मानला जातो. काळी पडलेली मान उजळवण्यासाठी हा सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. बटाटा किसून त्याचा रस काढा किंवा बटाट्याची चकती मानेवर चोळा. १५ ते २० मिनिटांनी त्वचा धुवा. यामुळे टॅनिंग कमी होते.
3. मान किंवा पाठ खूप काळपट झाली असेल तर बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट तयार करा. हे मानेवर लावून सुकल्यानंतर ओल्या हाताने मसाज करा.बेकिंग सोडा अत्यंत प्रभावी ठरतो. हे एक उत्तम एक्सफोलिएटर आहे.
4. कॉफी आणि साखरेचा स्क्रब देखील फायदेशीर आहे. १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा साखर आणि थोडे खोबरेल तेल एकत्र करा. या मिश्रणाने मानेवर आणि पाठीवर ५ मिनिटे हलका मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा उजळते.
