आपल्यापैकी अनेकजणींना केस खूपच पातळ असण्याची समस्या सतावते. कित्येकदा तर पातळ केसांतून फक्त फणी जरी फिरवली तरी केसांचे पुंजकेच्या - पुंजके हातात येतात. एकदा केस विंचरून जर असे मूठभर केस हातात येत असतील तर आपल्याला फारच टेंन्शन येत, आपल्याला टक्कल पडेल की काय अशी भीतीच वाटते. केस खूपच पातळ झाले की ते साधे विंचरायचे म्हटलं तरी भीती वाटते. पातळ झालेले केस फक्त कापून टाकणे हा उपाय नाही, तर त्यांना मुळापासून जाड, मजबूत करणे फार गरजेचे असते. केसांची चमक, जाडी आणि लांबी कमी झाली की संपूर्ण लूकवर त्याचा परिणाम होतो(how to make curry leaves and methi dana oil for hair growth & thin hair).
पातळ झालेले केस घनदाट, मजबूत आणि जाडजूड करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून नैसर्गिक पारंपरिक तेल फायदेशीर ठरते. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तयार केलेले पॉवरफुल हेअर ऑईल केवळ (natural hair oil to make hair thick and strong at home) केसगळतीच कमी करत नाही तर पातळ झालेले केस घनदाट, लांबसडक होण्यास मदत मिळते. विशेषतः नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं घरगुती तेल केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवतं, त्यांना आतून मजबूत करतं आणि केसांना लांब, काळेभोर, घनदाट व जाडजूड बनवण्यास मदत करतं. केसांची वाढ आणि मूळ मजबूत होण्यासाठी घरगुती तेल कसं (best homemade oil for thin and weak hair) तयार करायचं याचं सिक्रेट पाहूयात.
केसांना काळेभोर, घनदाट व जाडजूड करण्यासाठी तेल कसं तयार करायचं ?
केसांना काळेभोर, घनदाट व जाडजूड करण्यासाठी तेल तयार करताना आपल्याला १ कप कडीपत्त्याची पाने, १/२ कप पाणी, १ कप मेथी दाणे आणि २ कप खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
तेल नेमक कसं तयार करायचं ?
तेल तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांडयात कडीपत्त्याची पाने, मेथी दाणे आणि थोडं पाणी घेऊन एकत्रित पेस्ट वाटून घ्यावी. मग एका लोखंडी कढईत खोबरेल तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम तेलात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली कडीपत्ता, मेथी दाण्याची पेस्ट घालावी. सगळे मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. तेलाला एक हलकीशी उकळी काढून घ्यावी. मग गॅस बंद करून तेल थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यावर ते गाळून एका काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवावे.
नारळाच्या दुधाचे घरीच करा खोबरेल तेल! विकतपेक्षा स्वस्त आणि शुद्ध - तेल काढण्याची पाहा सोपी पद्धत...
मनानं स्ट्रॉंग व्हायचं असेल तर ७ गोष्टी करा, कुठल्याही परिस्थितीचा सामना कराल हसत हसत...
या तेलाचा केसांसाठी वापर कसा करावा ?
तयार तेल वापरताना हलकेच कोमट करून बोटांच्या मदतीने केसांच्या मुळाशी लावून मसाज करावा. केसांच्या मुळांपासून ते शेवटच्या टोकापर्यंत तेल लावून केसांना मसाज करावा. रात्रभर तेल केसांवर तसेच लावून ठेवावं, दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
हे घरगुती तेल वापरण्याचे फायदे...
१. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्यांच्या पानांमध्ये असलेले 'बीटा-कॅरोटीन' केसांच्या मुळांना ताकद देते आणि नवीन केस उगवण्यास मदत करते. यामध्ये मुबलक प्रमाणात बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे केसांचा काळा रंग टिकवून ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत.
२. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मेथी दाण्यांचा वापर केसांच्या मुळांना घट्ट पकडून ठेवण्याचे काम करतो, ज्यामुळे केसगळती कमी होते.
३. खोबरेल तेल :- खोबरेल तेलातील फॅटी ॲसिड्स केसांच्या आत जाऊन केसांना आतून मॉइश्चराईज करतात, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो. केसांचा पोत सुधारतो आणि पातळ केस हळूहळू जाड आणि मजबूत होऊ लागतात.
