Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > नारळाच्या दुधाचे घरीच करा खोबरेल तेल! विकतपेक्षा स्वस्त आणि शुद्ध - तेल काढण्याची पाहा सोपी पद्धत...

नारळाच्या दुधाचे घरीच करा खोबरेल तेल! विकतपेक्षा स्वस्त आणि शुद्ध - तेल काढण्याची पाहा सोपी पद्धत...

how to make coconut oil at home : how to extract coconut oil from coconut : natural coconut oil making process : घरच्याघरीच शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने खोबरेल तेल तयार करण्याची सोपी पद्धत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 14:21 IST2026-04-28T14:10:41+5:302026-04-28T14:21:55+5:30

how to make coconut oil at home : how to extract coconut oil from coconut : natural coconut oil making process : घरच्याघरीच शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने खोबरेल तेल तयार करण्याची सोपी पद्धत..

how to make coconut oil at home natural coconut oil making process how to extract coconut oil from coconut | नारळाच्या दुधाचे घरीच करा खोबरेल तेल! विकतपेक्षा स्वस्त आणि शुद्ध - तेल काढण्याची पाहा सोपी पद्धत...

नारळाच्या दुधाचे घरीच करा खोबरेल तेल! विकतपेक्षा स्वस्त आणि शुद्ध - तेल काढण्याची पाहा सोपी पद्धत...

खोबरेल तेल हे प्रत्येक भारतीय घराघरातील एक अविभाज्य घटक आहे. मग ते केसांच्या आरोग्यासाठी असो, त्वचेच्या सौंदर्यासाठी असो किंवा अगदी स्वयंपाकासाठी सुद्धा खोबरेल तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. बाजारात मिळणारं खोबरेल तेल अनेकदा रिफाइंड किंवा केमिकल प्रक्रियेतून गेलेलं असतं, त्यामुळे त्याची शुद्धता आणि नैसर्गिक गुणधर्म कमी होऊ शकतात. अशावेळी घरच्याघरीच शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने खोबरेल तेल तयार करणं हा एक उत्तम पर्याय ठरतो(how to make coconut oil at home).

ताज्या नारळापासून तयार केलेलं तेल केवळ केस आणि त्वचेसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. योग्य पद्धतीने आणि थोड्या संयमाने आपण घरीच अगदी शुद्ध खोबरेल तेल तयार करू शकता. नारळाच्या दुधापासून घरच्याघरीच 'व्हर्जिन कोकोनट ऑईल' बनवण्याची ही सोपी पद्धत तुमचं सौंदर्य तर वाढवेलच, पण तुमच्या केसांच्या आरोग्यातही चांगला बदल दिसेल. नारळापासून शुद्ध तेल काढण्याची ही पद्धत इतकी सोपी आहे की, तुम्ही पुन्हा कधीच बाजारातून तेल विकत घेणार नाही. घरच्याघरीच नारळाच्या (natural coconut oil making process) दुधापासून शुद्ध खोबरेल तेल काढण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूयात. 

घरच्याघरीच शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने खोबरेल तेल बनवण्याची पद्धत... 

घरच्याघरीच शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने खोबरेल तेल तयार करण्यासाठी आपल्याला ४ ते ५ मोठे आणि चांगले पिकलेले ओले नारळ, कोमट पाणी, मिक्सर आणि गाळणी किंवा सुती कापड आणि तेल ठेवण्यासाठी काचेची बाटली इतके साहित्य लागणार आहे. 

१. नारळ सोलणे आणि खवणे :- सर्वप्रथम नारळ फोडून त्यातील पाणी वेगळे करा. नारळाच्या वाट्यांपासून खोबरे वेगळे काढून घ्या. या खोबऱ्याचे लहान तुकडे करा किंवा ते किसून घ्या. खोबऱ्याचा काळा भाग काढला तर तेल अधिक पांढरे शुभ्र होते.

२. नारळाचे दूध काढणे :- किसलेले खोबरे मिक्सरमध्ये टाका आणि त्यात थोडे कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या. आता हे मिश्रण एका सुती कापडात घेऊन घट्ट पिळून घ्या, जेणेकरून त्यातील सर्व दूध एका भांड्यात जमा होईल. राहिलेल्या चोथ्यात पुन्हा थोडे कोमट पाणी घालून एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि पुन्हा दूध काढून घ्या.

आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...

मनानं स्ट्रॉंग व्हायचं असेल तर ७ गोष्टी करा, कुठल्याही परिस्थितीचा सामना कराल हसत हसत...

३. दूध स्थिर होऊ देणे :- नारळाचे हे दूध एका मोठ्या पातेल्यात किंवा काचेच्या बरणीत भरून १० ते १२ तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे दुधातील घट्ट क्रीम वरच्या बाजूला जमा होईल आणि पाणी खाली राहील.

४. क्रीम वेगळी करणे :- दुसऱ्या दिवशी भांड्याच्या वरच्या बाजूला असलेला घट्ट पांढरा थर (नारळ क्रीम) चमच्याने हळूवार काढून एका कढईत घ्या. खाली राहिलेले पाणी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा स्वयंपाकासाठी वापरू शकता.

५. तेल कढवणे :- आता ही क्रीम असलेली कढई मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. हे मिश्रण सतत ढवळत राहा. हळूहळू या क्रीममधून तेल सुटू लागेल. जसजसे पाणी आटेल, तसतसा पांढरा भाग तपकिरी होऊ लागेल आणि शुद्ध तेल वेगळे दिसेल.

६. गाळणे आणि साठवणूक :- जेव्हा भांड्यातील गाळ पूर्णपणे तपकिरी होईल, तेव्हा गॅस बंद करा. तेल थोडे कोमट झाल्यावर ते सुती कापडाने किंवा बारीक गाळणीने गाळून घ्या. तयार झालेले हे सुगंधी आणि पारदर्शक तेल एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

घरगुती शुद्ध खोबरेल तेलाचे फायदे... 

१. हे तेल टाळूला लावल्याने केसांची गळती थांबते आणि केस दाट होतात.

२. हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे कोरड्या त्वचेला मऊ करते.

३. यात कोणतेही पॅराबेन्स किंवा प्रिजर्वेटिव्ह नसल्यामुळे हे लहान मुलांच्या मसाजसाठीही सुरक्षित आहे.

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. नारळ ताजे आणि खराब नसावेत. 
२. तेल बनवताना ते गॅसच्या मंद आचेवर तयार करावे. 
३. तेल पूर्ण थंड झाल्यावरच बाटलीत भरुन साठवून ठेवा, त्यामुळे ते जास्त दिवस टिकतं.


Web Title : घर पर नारियल का तेल बनाएं: आसान, सस्ता और शुद्ध तरीका।

Web Summary : घर पर नारियल का तेल बनाना दुकान से खरीदने से ज़्यादा आसान और सेहतमंद है। इसमें ताज़े नारियल से दूध निकालकर, क्रीम को अलग करने के लिए ठंडा करके, और फिर क्रीम को तब तक गर्म करना शामिल है जब तक कि शुद्ध तेल न रह जाए। यह विधि बालों, त्वचा और खाना पकाने के लिए एक प्राकृतिक, रसायन-मुक्त उत्पाद सुनिश्चित करती है।

Web Title : Make coconut oil at home: Easy, cheap, and pure method.

Web Summary : Making coconut oil at home is easy and healthier than store-bought options. The process involves extracting milk from fresh coconuts, refrigerating to separate the cream, and then heating the cream until pure oil remains. This method ensures a natural, chemical-free product for hair, skin, and cooking.