Baaghi 3 Movie Review : | Baaghi 3 Movie Review : सुपर अ‍ॅक्शनची सुमार फ्लॉप कथा

Baaghi 3 Movie Review : सुपर अ‍ॅक्शनची सुमार फ्लॉप कथा

Release Date: March 06,2020Language: हिंदी
Cast: टाइगर श्रॉफ,श्रद्धा कपूर,रितेश देशमुख,अंकिता लोखंडे,जमील खोरी
Producer: साजिद नाडियाडवालाDirector: अहमद खान
Duration: 2 तास 23 मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे

'बागी २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केल्यानंतर 'बागी3'ची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत होते. सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यापासूनच टायगरच्या अ‍ॅक्शनची चर्चा होती. ट्रेलर आऊट झाल्यावर त्याला तुफान प्रतिसाददेखील सोशल मीडियावर मिळाला होता. 

रॉनी आणि विक्रम या दोन भावांची ही गोष्ट आहे. विक्रम हा पोलिस खात्यात काम करतो मात्र गुडांनशी सामना करताना त्याला दरवेळी रॉनीची गरज लागते.विक्रमला जेव्हा ही गरज असते त्यावेळी रॉनी त्याठिकाणी कसाही पोहोचतो आणि गुडांचा खात्मा करतो. मात्र एक दिवशी अचानक सिरीयामधील जैश-ए-लष्करचे दशतवादी विक्रमचे अपहरण करतात आणि इथेचं गोष्टीत ट्विस्ट येतो. रॉनी आपल्या भावाला वाचवण्यासाठी सिरीयात पोहोचतो आणि खरा सिनेमा इथून सुरु होतो. भावाला वाचवण्यात रॉनीला यश येते की नाही ते तुम्हाला सिनेमागृहात जाऊनच पाहावे लागले.        

मोठा भाऊ नेहमीच लहान भावाचे संरक्षण करतो हे आपण नेहमीच सिनेमा आणि मालिकांमध्ये अनेक वेळा पाहिले आहे. मात्र या सिनेमात उलट दाखवण्यात आले आहे आणि हि गोष्ट काही भारतीय प्रेक्षकांच्या पचनी पडणारी नाही. अ‍ॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या टायगर श्रॉफने मात्र या सिनेमात आपल्या फॅन्सना निराश केले नाही. परफेक्ट बॉडी, परफेक्ट अ‍ॅटिट्युड, दमदार अ‍ॅक्शन टायगरने पडद्यावर दाखवली आहे.श्रद्धा कपूरला सिनेमात करण्यासारखे काहीच नाही. रितेश देशमुखला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत खरंच इतके कमजोर आणि बावळट दाखवण्याची कथेची गरज होती का?, असा प्रश्न सतत सिनेमा पाहताना डोक्यात येतो. अबू जलालच्या भूमिकेत (जमील खोरी)ने खलनायकाची छाप सोडली आहे. सिनेमाच्या कथेत अजिबात दम नाही आहे. त्याहुन ही साजिदने या देशी कथेशी सिरीयाला जोडले आणि कथेचे लोकल कनेकश्नच तोडले. कॉरियोग्राफर अहमद खान सुपर अ‍ॅक्शन सिनेमा तयार करण्याच्या नादात फसला आहे. सिनेमात नको त्याठिकाणी गाणी टाकण्यात आली आहेत. सिनेमाचे संगीतही मनाला भावत नाही. अनेक चांगले संवाद, इमोशन्स आणि कॉमेडी सीन्स कमजोर कथेमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाहीत. 
   
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Baaghi 3 Movie Review :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.