विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी, संपत्तीत किती लाखांची झाली वाढ..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:23 PM2024-04-18T12:23:54+5:302024-04-18T12:24:30+5:30

पत्नीची जंगम मालमत्ता अधिक

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency Uddhav Sena candidate Vinayak Raut owns property worth 4 crore 90 lakhs | विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी, संपत्तीत किती लाखांची झाली वाढ..जाणून घ्या

विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी, संपत्तीत किती लाखांची झाली वाढ..जाणून घ्या

रत्नागिरी : उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १६) उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सादर केलेल्या मालमत्ता आणि संपत्तीविषयक शपथपत्रात त्यांनी स्थावर आणि जंगम मिळून एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यांची पत्नी शामल या जंगम मालमत्तेत त्यांच्यापेक्षा १६ लाख ७३ हजारांनी श्रीमंत आहेत.

विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात स्थावर मालमत्ता ३१ लाख ८७ हजार २९८ असल्याचे नमूद केले होते. यावेळी त्यांची जंगम मालमत्ता ६५ लाख ३४ हजार ८२९ रुपये एवढी आहे. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३३ लाख ३४ हजार ५३१ रुपयांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नीची ८२ लाख ८ हजार ५८३ इतकी जंगम मालमत्ता आहे.

तसेच गेल्या वेळी विनायक राऊत यांची स्थावर मालमत्ता ३ कोटी ८७ लाख एवढी होती. यावेळी ती ४ कोटी २५ लाख झाली आहे. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३८ लाखांची वाढ झाली आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ७४ लाखांची मालमत्ता आहे.

गेल्यावेळी विनायक राऊत यांच्याकडे २२० ग्रॅम सोने (६.५० लाख किमतीचे) होते. आताही तेवढेच सोने असून त्याची किंमत १३ लाख रुपये इतकी झालीआहे. पत्नी शामल यांच्याकडे गेल्यावेळी २४० ग्रॅम सोने होते. यावेळी त्यांच्याकडे ३४० ग्रॅम सोने आहे.

२०१९ च्या निवडणुकीवेळी विनायक राऊत यांच्याकडे स्काॅर्पिओ वाहन होते. यावेळी त्यांच्याकडे ३७ लाख ४१ हजार ३२१ रुपये किमतीचे फाॅर्च्युनर हे वाहन आहे.

२०१९ च्या निवडणुकीवेळी विनायक राऊत यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून एकूण ४ कोटी १८ लाख ८७ हजार रुपयांचे ते मालक होते. यावेळी त्यांच्याकडे एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता आहे. म्हणजे यावेळी त्यांच्या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांत एकूण ७१ लाख ४७ हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीवेळी त्यांच्यावर २८ लाख रुपयांचे कर्ज होते. यावेळी २० लाख ९७ हजार १०० एवढे कर्ज आहे.

Web Title: Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency Uddhav Sena candidate Vinayak Raut owns property worth 4 crore 90 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.