कार उलटून जैतापूरला पत्रकाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:58 IST2020-03-06T16:57:08+5:302020-03-06T16:58:24+5:30
कार उलटल्याने तालुक्यातील जैतापूर येथील सामजिक कार्यकर्ते, पत्रकार सचिन नरेंद्र नारकर (५0) यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाने रात्री झालेल्या अपघाताची माहिती सकाळी सर्वांना समजली आणि त्यानंतर त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढण्यात आले.

कार उलटून जैतापूरला पत्रकाराचा मृत्यू
राजापूर : कार उलटल्याने तालुक्यातील जैतापूर येथील सामजिक कार्यकर्ते, पत्रकार सचिन नरेंद्र नारकर (५0) यांचा अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवाने रात्री झालेल्या अपघाताची माहिती सकाळी सर्वांना समजली आणि त्यानंतर त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढण्यात आले.
जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरुन दळे मठवाडी कडे जाणाऱ्या तीव्र उतारावर त्यांची कार (एमएच 0८/ ८६४४) उलटली. गुरूवारी रात्री १0.३0 ते ११ वाजण्याच्या सुमारास ते घरी जात असताना हा अपघात झाला असल्याचा अंदाज आहे. मात्र सकाळपर्यंत त्याची माहिती कोणालाही मिळाली नाही.
सकाळी ८.३0 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी अनेकांनी गाडीकडे धाव घेतली. गाडीच्या काचा बंद होत्या. त्या फोडून नारकर यांना बाहेर काढून जैतापूर आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.