राज ठाकरे 19 एप्रिलची महाडमधील सभा गाजवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:46 IST2019-04-17T00:44:51+5:302019-04-17T00:46:22+5:30
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ एप्रिल रोजी सायं. ५:३० वा. महाड, चांदे क्रीडांगण येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज ठाकरे 19 एप्रिलची महाडमधील सभा गाजवणार
माणगाव : रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ एप्रिल रोजी सायं. ५:३० वा. महाड, चांदे क्रीडांगण येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये राज ठाकरे देशाच्या राजकीय परिस्थितीची चिरफाड करणार आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष व पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी माणगाव येथे मनसे कार्यालयामध्ये १६ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आताच्या नवडणूक पार्श्वभूमीवर मोदी विरुद्ध सर्व एकत्र आले आहेत. मोदी सरकारने ज्या योजना सांगितल्या, त्या योजनांचे कसे वाटोळे झाले आहे. ते पुराव्यानिशी चित्रफितीतून जनतेला दाखवण्यात येणार आहे, याकरिता रायगडच्या जनतेने या सभेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेसाठी दक्षिण रायगड मनसे जिल्हाप्रमुख देवेंद्र गायकवाड, मनसे उपाध्यक्ष विनय भोईटे आदी उपस्थित होते.