पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:07 IST2026-01-29T20:04:38+5:302026-01-29T20:07:03+5:30

महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवकांचा समावेश आहे.

Official group registration of Mahayuti in Panvel Municipal Corporation at the Commissioner's Office | पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी

पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी

पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी, शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची अधिकृत गट नोंदणी दि.29 रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी गटनेते नितीन पाटील यांच्यासोबत महायुतीचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते

माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. 

महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ नगरसेवकांचा समावेश आहे. याआधी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांच्या संयुक्त बैठकीत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली होती. 

आज झालेल्या गट नोंदणी प्रक्रियेमुळे नितीन पाटील यांची गटनेतेपदी शासनाकडे अधिकृत नोंद करण्यात आली आहे. महायुतीची गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया येत्या १० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

Web Title : पनवेल गठबंधन आयुक्त कार्यालय में आधिकारिक तौर पर पंजीकृत, समूह नेता नामित

Web Summary : पनवेल महानगर पालिका में भाजपा-शिवसेना-राकांपा गठबंधन ने आधिकारिक तौर पर अपने समूह को पंजीकृत किया। नितिन पाटिल समूह नेता हैं। गठबंधन ने 2026 के चुनाव में 59 पार्षदों के साथ जीत हासिल की। महापौर और उप महापौर के लिए चुनाव 10 फरवरी को होंगे।

Web Title : Panvel Alliance Officially Registered at Commissioner's Office, Group Leader Named

Web Summary : The BJP-Shiv Sena-NCP alliance in Panvel Municipal Corporation officially registered its group. Nitin Patil is the group leader. The alliance won the 2026 elections with 59 councilors. Elections for mayor and deputy mayor will be held on February 10.