रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
By राजेश भोस्तेकर | Updated: May 3, 2024 10:48 IST2024-05-03T10:46:52+5:302024-05-03T10:48:02+5:30
शिवसेना (ठाकरे गट) दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान, विकास गोगावले सह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
अलिबाग : शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले. मात्र या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झाल आहे. या हल्या प्रकरणी आमदार पुत्र विकास गोगावले सह २० ते २५ जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुरीवर २ मे रोजी महाड येथील सभा आटोपून नवगणे परत इंदापूर इथं आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणी वरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणे यांनी केलाय. महाड येथील सभेत नवगणे यांनी आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती.