काकींना इतिहास माहीत नसावा : रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 08:33 IST2024-03-28T08:32:57+5:302024-03-28T08:33:18+5:30

श्रीकृष्णाला कुटुंबातील लोकांनी घेरलं पण विजय श्रीकृष्णाचाच झाला, असे वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्याला रोहित यांनी प्रत्युत्तर दिले.

Kaki should not know history: Rohit Pawar | काकींना इतिहास माहीत नसावा : रोहित पवार

काकींना इतिहास माहीत नसावा : रोहित पवार

अलिबाग : काकींना इतिहास माहीत नसावा, त्यांच्या अवती-भवती असणाऱ्यांनी त्यांना चुकीचा इतिहास सांगितला असावा. इतिहास श्रीकृष्णाच्या कुटुंबाचा नव्हता, तर कौरव-पांडव यांचा होता, असे टोला आमदार रोहित पवार यांनी बुधवारी येथे लगावला. 

श्रीकृष्णाला कुटुंबातील लोकांनी घेरलं पण विजय श्रीकृष्णाचाच झाला, असे वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्याला रोहित यांनी प्रत्युत्तर दिले. श्रीकृष्ण सत्याच्या बाजूने उभे राहिले आणि सत्याचा विजय झाला. आज जे शरद पवारांना, पुरोगामी विचारांना सोडून गेले त्यात अजित पवारही आहेत. ते असत्याच्या बाजूने आहेत, असेही पवार यांनी या वेळी सांगितले. 

मुरुड येथे शेकापचा निर्धार मेळावा झाला. यात रोहित पवार बोलत होते. शेकापचे आमदार जयंत पाटील, महिला अध्यक्षा चित्रलेखा पाटील या वेळी उपस्थित होते. यावेळी रोहित यांनी सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. तटकरे हे उद्या अजित पवार यांना सोडून सत्तेसाठी भाजपबरोबरही जाण्यास तयार होतील, अशी टीका त्यांनी केली. 

Web Title: Kaki should not know history: Rohit Pawar