रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By निखिल म्हात्रे | Updated: April 18, 2024 17:36 IST2024-04-18T17:34:09+5:302024-04-18T17:36:14+5:30
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
निखिल म्हात्रे, अलिबाग :रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला होता.
तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अलिबाग रेवदंडा बायपास येथे डीकेटी शाळेच्या समोरील मैदानात महायुतीची प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सभेनंतर तटकरे यांनी उमेदवारी अर्ज किशन जावळे यांच्याकडे सादर केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार महेंद्र दळवी, शिंदे सेनेचे पक्ष प्रतोद भरत गोगावले, भाजपचे धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.