Pune: राजगडावर पाण्याच्या टाकीत बुडून युवकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 17:10 IST2023-08-15T17:09:26+5:302023-08-15T17:10:37+5:30

किल्ला फिरून झाल्यावर रात्री पद्मावती मंदिरात सर्वांनी मुक्काम केला....

Youth dies after drowning in water tank at Rajgad pune latest news | Pune: राजगडावर पाण्याच्या टाकीत बुडून युवकाचा मृत्यू

Pune: राजगडावर पाण्याच्या टाकीत बुडून युवकाचा मृत्यू

वेल्हे (पुणे) :  तालुक्यातील किल्ले राजगडावर रात्रीच्या अंधारात अजय मोहनन कल्लामपारा( वय 33 वर्षे ) युवकाचा पद्मावती तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, दिनांक 14 ऑगस्ट रोजी किल्ले राजगड पाहण्यासाठी मुंबई येथील सागर किसन माने, अजय तिसकर, अविनाश जाधव, अभिषेक आंबट, या सर्वांचा ग्रुप आला  होता. दुपारी साडेतीन वाजता हे सर्वजण किल्ल्यावर पोहोचले किल्ला फिरून झाल्यावर रात्री पद्मावती मंदिरात सर्वांनी मुक्काम केला.

मध्यरात्री २.३० वाजता अजय तीसकर हा टॉयलेटला उठला, त्याने आज सागर माने यास टॉयलेटला जाण्यासाठी जागा विचारली होती, त्यानंतर सागर माने याला चार वाजता जाग आल्यानंतर शेजारी झोपलेला अजय मोहनन कल्लामपारा झोपलेला दिसला नाही. मित्रांनी शोध घेतल्यानंतर पद्मावती तलावात अजय मोहनन कल्लामपारा याचे तलावाच्या पाण्यात चप्पल टॉर्च व पाणी बॉटल पाण्यात तरंगताना दिसली, पहाटे सहा वाजता इतर लोकांना बोलावून शोध घेतला असताअजय मोहनन कल्लामपारा याचा मृतदेह पाण्यात दिसला याबाबत अधिक तपास वेल्हे पोलीस करत आहेत

Web Title: Youth dies after drowning in water tank at Rajgad pune latest news