Pune Crime: कोल्ड्रींक्समध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 19:47 IST2021-11-25T19:28:01+5:302021-11-25T19:47:31+5:30
फिर्यादी महिला आणि आरोपींची एका वेबसाईटवरून ओळख झाली होती...

Pune Crime: कोल्ड्रींक्समध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेवर बलात्कार
पिंपरी: लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर बंगळूरू, पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तेथे कोल्डींक्समध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने २४ नोव्हेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सचिन बलदेव शर्मा (रा. विकास कॉलनी, पटियाला, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार २४ जानेवारी २०२० ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपींची एका वेबसाईटवरून ओळख झाली होती.
सचिन याने महिलेला लग्नाचे अमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तेथे महिलेला गुंगी येणारे औषध कोल्ड्रिंक्समध्ये मिसळून दिले. महिला बेशुद्धावस्थेत असताना सचिन याने महिलेवर बलात्कार केला. सचिन याने बलात्कार आणि फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.