राजगड किल्ल्यावर डोक्यात दगड पडून महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 18:27 IST2025-11-16T18:27:02+5:302025-11-16T18:27:19+5:30
उपचारासाठी रुग्णालयात दाखल.

राजगड किल्ल्यावर डोक्यात दगड पडून महिला जखमी
राजगड- राजगड तालुक्यातील राजगड किल्ल्यावर जाताना एका 38 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिला जखमी झाली असून, तिला प्राथमिक उपचार करुन तिला पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठविण्यात.
याबाबत अधिक माहिती अशी की, किल्ले राजगडवर मुंबई येथून 20 महिलांचा ग्रुप आला होता. किल्ल्यावर माकडे खेळत होती. महिला खाली उतरत असताना, माकडांमुळे एक दगड खाली महिलेच्या डोक्यात पडला. यात वर्षा हुंडारी (वय अंदाजे 38) जखमी झाल्या. या घटनेनंतर किल्ल्यावरील पहारेकरी विशाल पिलावरे, बापू साबळे आणि दादू वेगरे यांनी प्रसंगावधान दाखवून मुलांच्या मदतीने महिलेला अवघ्या तीस मिनिटात किल्ल्याचा खाली आणले. महिला खाली आल्यानंतर राजगड पोलिस स्टेशनचे हवालदार सोमेश राऊत यांनी 108 क्रमकांच्या रुग्ण वाहिकेशी संपर्क साधून गाडी बोलावून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.