Ajit Pawar: पुणे, पिंपरीत शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार? चर्चा करणार असल्याचे अजित पवारांचे सूतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:29 IST2026-01-01T16:28:34+5:302026-01-01T16:29:30+5:30
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्रित लढण्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले

Ajit Pawar: पुणे, पिंपरीत शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार? चर्चा करणार असल्याचे अजित पवारांचे सूतोवाच
कोरेगाव भीमा : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे. मात्र दोन्हीकडे भाजप आणि शिंदेसेनेची युती फिस्कटली आहे. शिंदेसेना आणि भाजप दोन्हीकडे स्वबळावर लढणार असल्याचे दिसते आहे. त्याबाबत बोलताना अजित पवारांनी शिंदे सेनेबरोबर एकत्रित लढणार असल्याचे सूतोवाच दिले आहेत.
२०८वा शौर्यदिन १ जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्रित लढण्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार आहे. ज्यांच्यासोबत युती झाली त्यांना काही जागा सोडण्यात आल्या आहेत. आणि स्थानिक ठिकाणी आघाड्याही होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी असूनही १ जानेवारीला मानवंदनेसाठी राज्यासह देशभरातून अनुयायी मोठ्या प्रमाणात येत असल्याने अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने शौर्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी आलेलो असून, याठिकाणी येणाऱ्या अनुयायांना जिल्हा व पोलिस प्रशासनातर्फे चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होती. निवडणुकीचे दिवस असूनही राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी आरपीआय गटाचे सचिन खरात यांनी बोलताना सांगितले की, ‘अजित पवार यांच्याशी कोरेगाव भीमा परिसराच्या विकासाबाबत चर्चा झाली असून, बाकीच्या विषयावर चर्चा झाल्यानंतर माध्यमाशी बोलेल, असे सांगत गुंडांच्या उमेदवारीवर बोलणे त्यांनी टाळले.