श्रीमंत बाजीराव पेशवेंच्या वंशजांना हवीय मदत, मनसेच्या मोरेंची भेट घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:25 IST2021-06-23T16:17:31+5:302021-06-23T16:25:41+5:30
नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे आता श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे 13 वे वंशज असलेल्या उदयसिंह पेशवे यांनी धाव घेतली. वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.

श्रीमंत बाजीराव पेशवेंच्या वंशजांना हवीय मदत, मनसेच्या मोरेंची भेट घेतली
पुणे - पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे आपल्या कामाच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळेच, त्यांच्याकडे अगदी गाडीवाल्यापासून ते दिग्गजांपर्यंत अनेकजण कामं घेऊन जातात. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला न्याय देण्याचा मोरे यांचा प्रयत्न असतो. कोरोना कालावधीतील त्यांच्या कामाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर, काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या ताब्यातील गाडीवर त्यांनी घातलेला हातोडाही चर्चेचा विषय बनला होता.
नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे आता श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे 13 वे वंशज असलेल्या उदयसिंह पेशवे यांनी धाव घेतली. वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. ''काल कात्रज ऑफिसमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवे यांनी भेट दिली. श्री देव देवेश्वर संस्थान पुणे, पर्वती, सारसबाग आणि कोथरूड यांचे ते प्रमुख आहेत. त्या ठिकाणच्या काही अडचणीसाठी त्यांना माझी मदत हवी होती, त्यासाठी ते भेटीला आले होते.
मी त्यांना म्हणालो होतो, श्रीमंत मी येतो पण ते ऐकले नाहीत आणि तेच आले. याही वयात अतिशय संयमी आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व.
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 22, 2021
धन्यवाद श्रीमंत. 🙏🏻
२/२#पुणे#Pune#पेशवा#पेशवे
दरम्यान, भेटीबाबत बोलताना, श्रीमंत मी आपल्या भेटीला येतो असे म्हटले, पण ते ऐकले नाहीत आणि तेच आल्याचे मोरे यांनी सांगितलं. तसेच, याही वयात उदयसिंह यांचे व्यक्तिमत्व अतिशय संयमी आणि सृजनशील असल्याचे सांगत त्यांचे धन्यवादही मोरे यांनी केले.
व्हिडिओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या जामरवरच नगरसेवक मोरे यांनी हातोडा घातला होता. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या अंपग व्यक्तीच्या गाडीला बंधनमुक्त करुन त्यांनी दिव्यांग व्यक्तीची गाडी त्यास परत मिळवून दिली. तर, यापूर्वीही महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडल्यामुळे वसंत मोरे चर्चेत आले होते. त्यानंतर, जॅमरने एक घाव दोन तुकडे केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.