VIDEO: लोकांचे विषय समजून घेतल्याने कर्जत नगरपंचायतीमध्ये विजय : आमदार रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 14:06 IST2022-01-19T13:34:15+5:302022-01-19T14:06:47+5:30
आज जाहीर झालेल्या नगरपंचायत निकालांमध्ये कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने विजय मिळवला आहे...

VIDEO: लोकांचे विषय समजून घेतल्याने कर्जत नगरपंचायतीमध्ये विजय : आमदार रोहित पवार
बारामती (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र ही निवडणूक लढवली होती. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. कर्जत शहरात लोकांमध्ये जाऊन लोकांचे विषय समजून घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली त्याला कर्जत शहरातील नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला, असे प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी व्यक्त केली.
कर्जत नगर पंचायत निवडणुकीतील विजयानंतर काय म्हणाले रोहित पवार...#Pune#rohitpawar#karjatjamkhedpic.twitter.com/e0VIKdOEz6
— Lokmat (@lokmat) January 19, 2022
आज जाहीर झालेल्या नगरपंचायत निकालांमध्ये कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने विजय मिळवला आहे. १२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर ३ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, असे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले आहेत.