Vadgaon Maval Local Body Election Result 2025: वडगाव नगरपंचायतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता, नगराध्यक्षपदी अबोली मयूर ढोरे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:12 IST2025-12-21T18:11:59+5:302025-12-21T18:12:07+5:30

Vadgaon Maval Local Body Election Result 2025 वडगावमध्ये चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखत नऊ जागांवर विजय मिळवला, तर भाजपने सहा जागा जिंकल्या

Vadgaon Maval Local Body Election Result 2025 Ajit pawar NCP is in power in Vadgaon Nagar Panchayat, Aboli Mayur Dhore wins the post of Mayor | Vadgaon Maval Local Body Election Result 2025: वडगाव नगरपंचायतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता, नगराध्यक्षपदी अबोली मयूर ढोरे विजयी

Vadgaon Maval Local Body Election Result 2025: वडगाव नगरपंचायतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता, नगराध्यक्षपदी अबोली मयूर ढोरे विजयी

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अबोली मयूर ढोरे या विजयी झाल्या असून, त्यांनी महायुतीच्या उमेदवार ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांचा १४६० मतांनी पराभव केला. अबोली ढोरे यांना ७७९५ मते मिळाली. तर म्हाळसकर यांना ६३३५ मते मिळाली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखत नऊ जागांवर विजय मिळवला, तर भाजपने सहा जागा जिंकल्या. तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी वडगाव शहरातून भव्य मिरवणूक काढली होती. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण निकम उपस्थित होते.

नगराध्यक्षपदासाठी झालेले मतदान

१) अबोली मयूर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) -७७९५
२) मृणाल गुलाबराव म्हाळसकर, भाजपा -६३५५
३) वैशाली पवन उदागे, वंचित बहुजन आघाडी -२५८
४) नोटा                                     १३१
५ )शेख नजमाबी अलताफ, अपक्ष -३१

प्रभाग क्र. १
१) पूनम विकी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) -६७०

प्रभाग क्र.२
ढोरे दिनेश गोविंद, भाजपा -५६०

प्रभाग क्र. ३
रोहित मंगेश धडवले, भाजपा-४१५

प्रभाग क्र. ४
 सुनीता राहुल ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ३२३

प्रभाग क्र. ५
१) रुपाली अतुल ढोरे, अपक्ष -५०४

प्रभाग क्र.६
विशाल वसंतराव वहिले, भाजपा -४७३

प्रभाग क्र. ७
अजय महेंद्र भवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -३९३

प्रभाग क्र. ८
माया अमर चव्हाण- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ३९८

प्रभाग क्र. ९
सारिका प्रशांत चव्हाण, अपक्ष- ४४३

प्रभाग क्र. १०
आकांक्षा योगेश वाघवले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -४१२

प्रभाग क्र. ११
ढोरे सुनील गणेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -५५३

प्रभाग क्र. १२
गणेश सोपान म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -३६३

प्रभाग क्र. १३
अजय बाळासाहेब म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-५३२

प्रभाग क्र. १४
वैशाली गौतम सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -३०६

प्रभाग क्र. १५
अनंता बाळासाहेब कुडे, भाजपा- ६०९

प्रभाग क्र. १६
राणी संतोष म्हाळसकर, भाजपा- ३८५

प्रभाग क्र. १७
अर्चना संतोष म्हाळसकर, भाजपा - ८४४

Web Title : एनसीपी की अबोली ढोरे ने वडगाँव मावल स्थानीय निकाय चुनाव 2025 जीता

Web Summary : एनसीपी की अबोली ढोरे ने वडगाँव नगर पंचायत चुनाव जीता, भाजपा की मृणाल म्हाळस्कर को 1460 वोटों से हराया। एनसीपी ने नौ सीटें, भाजपा ने छह सीटें जीतीं, और दो निर्दलीय जीते। परिणाम के बाद जश्न मनाया गया।

Web Title : NCP's Abolie Dhore Wins Vadgaon Maval Local Body Election 2025

Web Summary : Abolie Dhore of NCP won Vadgaon Nagar Panchayat election, defeating BJP's Mrunal Mhalskar by 1460 votes. NCP secured nine seats, BJP six, and two independents won. Celebrations followed the announcement.