Ajit Pawar: महापालिकेची प्रक्रिया, कायदे समजून घ्या; अजित पवारांचा पुण्यातील नगरसेवकांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:34 IST2026-01-20T15:33:42+5:302026-01-20T15:34:49+5:30

पुण्याच्या नगरसेवकांनी मतदानावेळी मतदान यंत्रात झालेले बिघाड, यंत्र बंद पडणे व अन्य तांत्रिक चुकांचा पाढा पवार यांच्यासमोर वाचला

Understand the municipal corporation's processes and laws; Ajit Pawar's advice to Pune corporators | Ajit Pawar: महापालिकेची प्रक्रिया, कायदे समजून घ्या; अजित पवारांचा पुण्यातील नगरसेवकांना कानमंत्र

Ajit Pawar: महापालिकेची प्रक्रिया, कायदे समजून घ्या; अजित पवारांचा पुण्यातील नगरसेवकांना कानमंत्र

पुणे : शहराच्या विकासासाठी चांगले काम करा, लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या. महापालिकेत अनेकदा निवडून गेलेल्या नगरसेवकांचे मार्गदर्शन घ्या. नगरसेवक म्हणून काम करताना महापालिकेची प्रक्रिया, कायदे समजून घ्या, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे (अजित पवार) २७ तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला ३ जागांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करून अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील उपस्थित होते.

पवार यांनी महापालिका निवडणुकीमध्ये आपण कुठे कमी पडलो, पक्षाने तयार केलेल्या पॅनेलमधील कोण पराभूत झाले, पराभूत होण्याची कारणे काय होती, हे नगरसेवकांकडून जाणून घेत आढावा घेतला. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी मतदानावेळी मतदान यंत्रात झालेले बिघाड, यंत्र बंद पडणे व अन्य तांत्रिक चुकांचा पाढा पवार यांच्यासमोर वाचला. यावेळी पक्षाच्या गटनेता निवडीबाबतही चर्चा झाली, त्यावेळी गटनेता निवडीचे अधिकार पक्षाच्या नेत्यांकडून अजित पवार यांना देण्यात आले.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचाही स्वतंत्र गटनेता

महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष महापालिका निवडणूक एकत्र लढले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) निवडून आलेले सोपान उर्फ काका चव्हाण, अनिता इंगळे व हाजी गफूर या तिघांनी अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचाही महापालिकेत स्वतंत्र गट राहणार असून त्यांचाही गटनेता निवडला जाण्याची शक्यता आहे.

Web Title : अजित पवार की पुणे पार्षदों को सलाह: नगरपालिका प्रक्रिया, कानून समझें।

Web Summary : अजित पवार ने नए निर्वाचित पुणे पार्षदों को जन-उन्मुख कार्यों को प्राथमिकता देने और नगरपालिका प्रक्रियाओं को समझने का मार्गदर्शन किया। उन्होंने चुनाव में हुई कमियों की समीक्षा की और मतदान के दौरान तकनीकी मुद्दों पर चर्चा की। दोनों एनसीपी गुटों के लिए अलग-अलग समूह नेता नियुक्त किए जाने की उम्मीद है।

Web Title : Ajit Pawar advises Pune corporators: Understand municipal processes, laws.

Web Summary : Ajit Pawar guided newly elected Pune corporators to prioritize public-oriented work and understand municipal procedures. He reviewed election setbacks and discussed technical issues during voting. Separate group leader appointments are expected for both NCP factions.