पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:51 IST2025-07-29T19:49:50+5:302025-07-29T19:51:49+5:30

दारूची दुकाने उघडी ठेवणाऱ्या मालकांना सांगा, जर दुकाने सुरु ठेवली तर सात पिढ्या त्याला दारू विकता येणार नाही, अशी कारवाई करणार

Those who drink alcohol and create ruckus during Ganeshotsav in Pune will be put in jail for a month or two; Commissioner warns | पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा

पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा

पुणे : पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावर्षी पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेश उत्सव राहील यात शंका नसल्याचे स्पष्ट केले. यंदाचा गणेशाेत्सव निर्बंध आणि भयमुक्तमुक्त राहील. पोलिस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. परंतु या उत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या लोकांना शोधून एक दोन महिने आतमध्ये टाकणार असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. 

कुमार म्हणाले, आपले सहकार्य असेल तर मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंतच संपवण्याचा प्रयत्न करू. यंदाचा गणेशाेत्सव निर्बंध आणि भयमुक्तमुक्त राहील. पोलिस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत. गेल्या वर्षी आमच्याकडून टिळक रोड वरील विसर्जन मिरवणुकीत नियोजन झाले नाही हे आम्ही मान्य करतो. मात्र यावेळी आम्ही योग्य वेळी नियोजन करू. यावर्षी पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेश उत्सव राहील यात शंका नाही. यंदा आपण रात्री १२ वाजेपर्यंतच विसर्जन मिरवणुक संपवून एक नवीन परंपरा सुरू करू. आपण सर्वांनी शिस्तच पालन करूयात.   

दारू विकणाऱ्या विक्रेत्यांना आणि पिणाऱ्यांना कुमार यांनी कडक इशारा दिला आहे. विसर्जनाच्या दिवशी दारूची दुकाने उघडी ठेवू नका असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दारू पिणाऱ्या लोकांना शोधून काढा. धिंगाणा घालणाऱ्या अशा लोकांना एक दोन महिने आत टाका अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. दुकाने उघडी ठेवणाऱ्या मालकांना सांगा, जर दुकाने सुरु ठेवली तर सात पिढ्या त्याला दारू विकता येणार नाही अशी कारवाई केली जाईल. विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्यांचे व्हिडिओ काढा. कोण शर्ट काढून नाचते ड्रिंक करून नाचते हे होऊ नये यासाठी आता पासून आपण प्रबोधन करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. 

Web Title: Those who drink alcohol and create ruckus during Ganeshotsav in Pune will be put in jail for a month or two; Commissioner warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.