तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:21 IST2023-03-31T20:21:47+5:302023-03-31T20:21:54+5:30

पत्नीने केलेल्या आत्महत्येच्या नैराश्यातून पतीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

The husband and wife who got married three months ago ended their lives within 2 days of each other | तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन

नसरापूर : भोर तालुक्यातील केळवडे येथे पत्नींच्या आत्महत्येनंतर दोन दिवसातच पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धीरज संभाजी कोंडे (वय २९) व समृद्धी धीरज कोंडे (वय २२)दोघेही रा. केळवडे, ता. भोर अशी पती पत्नीची नावे असून त्यांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. उच्चशिक्षित पती-पत्नींनी दोन दिवसांच्या अंतराने आत्महत्या केली. 

शिंदेवाडी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज संभाजी कोंडे (वय २९, रा. केळवडे) याचे मुळशी तालुक्यातील समृद्धी हीच्याशी गेल्या डिसेंबर मध्ये विवाह झाला होता. समृध्दीने कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा केला होता. तर धीरज उच्चशिक्षित होता. समृद्धी तिच्या पिरंगुट येथील मावशीकडे माहेरी आली असताना समृध्दी धिरज कोंडे हिने दि २८ मार्च रोजी तिचे मावशीचे घरी पिरंगुट येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर तिचा अंत्यविधी दि २९ मार्च रोजी तिच्या सासरी केळवडे(ता.भोर) येथे अंत्यविधी झाल्यानंतर धीरज मानसिक तणावामध्ये होता. धीरजने पुढील दोन दिवसातच म्हणजे दि ३० मार्च रोजी दुपारी १ वाजण्याचे सुमारास केळवडे (ता. भोर) येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास सोडवुन तातडीने नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. आठ दिवसांपूर्वी काही कारणासाठी माहेरी गेलेल्या समृद्धीने पिरंगुट येथे आत्महत्या केली. त्यानंतर दोनच दिवसांनी धीरजने पत्नीने केलेल्या आत्महत्येच्या नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा फिर्यादी नुसार प्राथमिक अंदाज आहे. 

Web Title: The husband and wife who got married three months ago ended their lives within 2 days of each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.