Chandrashekhar Bawankule | "देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची शरद पवारांना धास्ती"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 20:03 IST2023-02-22T19:55:34+5:302023-02-22T20:03:20+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांचे कसब्यात प्रचारादरम्यान वक्तव्य...

Chandrashekhar Bawankule | "देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची शरद पवारांना धास्ती"
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने जिंकून येतील. आमचे सगळे कार्यकर्ते मॅन टु मॅन प्रचार करत आहेत. राज्य आणि केंद्र हे डबल इंजिन सरकार मुक्ता ताई यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करतील यावर लोकांचा विश्वास आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान केले.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल. त्यांना भाजपसोबत युती हवी होती पण फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालतील पण फडणवीस नको आहेत. हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळेच पवार हे फडणवीस यांना विरोध करायचे. फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काही करू शकतात, असंही बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule | "देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची शरद पवारांना धास्ती"#SharadPawarpic.twitter.com/4A7UByg4WS
— Lokmat (@lokmat) February 22, 2023