दौंडच्या दूरध्वनी कार्यालयातील सुरक्षारक्षकाचा अज्ञात चोरट्यांकडून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:11 IST2022-07-26T14:11:37+5:302022-07-26T14:11:47+5:30

चोरटे दूरध्वनी कार्यालयातील तांब्याच्या तारांची चोरी करून पळून गेले.

Security guard in telephone office of Daund killed by unknown thieves | दौंडच्या दूरध्वनी कार्यालयातील सुरक्षारक्षकाचा अज्ञात चोरट्यांकडून खून

दौंडच्या दूरध्वनी कार्यालयातील सुरक्षारक्षकाचा अज्ञात चोरट्यांकडून खून

दौंड : दौंड येथील दूरध्वनी कार्यालयातील सुरक्षारक्षक प्रकाश सुखेजा ( वय ६०) यांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. यावेळी चोरटे दूरध्वनी कार्यालयातील तांब्याच्या तारांची चोरी करून पळून गेले. 

प्रकाश सुखेजा हे खाजगी तत्वावर दूरध्वनी कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कामकाज करीत होते. रात्री दोन ते तीन अज्ञात चोरटे आले त्यांनी दूरध्वनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी तांब्याच्या तारा चोरी करीत असताना सुरक्षारक्षक प्रकाश सुखेजा यांनी चोरट्यांना प्रतिकार केल्याने त्यांचा खून करण्यात आला. सदरचे दूरध्वनी कार्यालय एकांतात आणि निर्मनुष्य ठिकाणी आहे.

Web Title: Security guard in telephone office of Daund killed by unknown thieves