श्रीमंत दगडूशेठनं लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेला अजून मजबूत केलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 21:27 IST2021-09-16T21:24:38+5:302021-09-16T21:27:33+5:30
कोरोना महामारीच्या काळात सर्व नियम पाळून भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन आणि आरतीची सोय केली आहे. हि बाब प्रशंसनीय आहे

श्रीमंत दगडूशेठनं लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेला अजून मजबूत केलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे जगभरात कौतुक केले जाते. गणेशोत्सवाबरोबरच बाराही महिने लाखोंच्या संख्येने बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवात तर भक्तांची अलोट गर्दी असते. मात्र मागील वर्षांपासून कोरोना महामारीने गणेशोत्सव साधेपणाने करत आहे.
यंदाही दर्शन आणि आरती ऑनलाइनच्या माध्यमातून भाविकांना दाखवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही श्रीमंत दगडूशेठला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत ऑनलाइनच्या कामाचेही कौतुक पत्राद्वारे केल आहे.
''श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे १२९ वे वर्ष सुरु आहे. हे ऐकून मन प्रसन्न झाले. कोरोना महामारीच्या काळात सर्व नियम पाळून भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन आणि आरतीची सोय केली आहे. हि बाब प्रशंसनीय आहे. अस म्हणत दगडूशेठच्या गणपतीला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.''
''लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत लोकांना एकत्र आणण्यासाठी या गणेशोत्सवाची सुरुवात केली. दगडूशेठनं टिळकांची हीच परंपरा मजबूत करण्याची जबाबदारी पार पडली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी गणेशोत्सवाचे ऑनलाइनचे आयोजन अजूनच विशेष वाटू लागले असल्याचं त्यांनी पत्रातून नमूद केलंय.''
''श्रीमंत दगडूशेठच्या हलवाई गणपतीच्या ट्रस्टला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. गणपतीच्या चरणी अशी प्रार्थना आहे कि, सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती घेऊन ये अशी प्रार्थना त्यांनी केली आहे''