एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 11:59 IST2023-06-20T11:57:16+5:302023-06-20T11:59:31+5:30

वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...

revealed that Darshana Pawar, who became an officer after passing the MPSC exam, was murdered | एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड

एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड

वेल्हे (पुणे) :एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. यामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले असून, वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे (रा.नाशिक) हे १२ जूनला ट्रेकिंगसाठी राजगडावर आले होते. दरम्यान, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला, तर तिचा मित्र राहुल हंडोरेचा अद्यापही मिळून आलेला नाही. दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाला पोलिसांना नुकताच मिळाला आहे.

त्यामध्ये दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्याला मारहाणीच्या जखमा असून, त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे राहुल हंडोरे अजूनही मिळत नसल्याने, त्याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार तपास करीत आहेत.

Web Title: revealed that Darshana Pawar, who became an officer after passing the MPSC exam, was murdered