पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:11 IST2025-07-29T14:10:22+5:302025-07-29T14:11:01+5:30
दारू पिणाऱ्या लोकांना शोधून काढा. आणि एक दोन महिने आत टाका, अमितेश कुमारांच्या पोलिसांना सूचना

पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त
पुणे : पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे. आपले सहकार्य असेल तर मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंतच संपवण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणाले आहेत. यंदाचा गणेशाेत्सव निर्बंध आणि भयमुक्तमुक्त राहील. पोलिस व प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत असेही त्यांनी मागील एका कार्यक्रमात सांगितले होते. आता यावर्षी पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेश उत्सव राहील यात शंका नसल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.
कुमार म्हणाले, गेल्या वर्षी आमच्याकडून टिळक रोड वरील विसर्जन मिरवणुकीत नियोजन झाले नाही हे आम्ही मान्य करतो. मात्र यावेळी आम्ही योग्य वेळी नियोजन कर. यावर्षी पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेश उत्सव राहील यात शंका नाही. आपले सहकार्य असेल तर आपण रात्री १२ वाजेपर्यंतच विसर्जन मिरवणुक संपवू असा प्रयत्न करू. या वर्षी एक नवीन परंपरा सुरू करा. आपण सर्वांनी शिस्तच पालन करूयात.
दारू विकणाऱ्या विक्रेत्यांना कुमार यांनी कडक इशारा दिला आहे. विसर्जनाच्या दिवशी दारूची दुकाने उघडी ठेवू नका असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. जे दारूचे दुकान उघडे ठेवतील. दारू पिणाऱ्या लोकांना शोधून काढा. आणि एक दोन महिने आत टाका अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. दुकाने उघडी ठेवणाऱ्या मालकांना सांगा, जर दुकाने सुरु ठेवली तर सात पिढ्या त्याला दारू विकता येणार नाही अशी कारवाई केली जाईल. विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्यांचे व्हिडिओ काढा. कोण शर्ट काढून नाचते ड्रिंक करून नाचते हे होऊ नये यासाठी आता पासून आपण प्रबोधन करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.