PMC Election Results 2026: सोशल मीडियावर View लाखात अन् मतं हजारात!पुणेकरांनी या उमेदवारांना का नाकारले? 

By किरण शिंदे | Updated: January 18, 2026 17:53 IST2026-01-18T17:50:27+5:302026-01-18T17:53:32+5:30

पुढील महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक नव्या, तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांनी संधी दिली आणि अनेकांनी त्या संधीचं सोनं केलं..

Pune Municipal Election Results 2026 'Star' on FB, Insta, but cold in the elections..! Views in lakhs and votes in thousands! Why did Punekars reject these candidates? | PMC Election Results 2026: सोशल मीडियावर View लाखात अन् मतं हजारात!पुणेकरांनी या उमेदवारांना का नाकारले? 

PMC Election Results 2026: सोशल मीडियावर View लाखात अन् मतं हजारात!पुणेकरांनी या उमेदवारांना का नाकारले? 

पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यंदाच्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला कौल दिलाय. मात्र या निवडणुकीतून सोशल मीडियावरील लोकप्रियता, व्हायरल व्हिडीओ आणि लाखो फॉलोवर्स असले तरीही याचा फायदा मतपेटीत होतोच असं नाही, हे या निकालाने दाखवून दिले आहे..

पुढील महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक नव्या, तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांनी संधी दिली आणि अनेकांनी त्या संधीचं सोनं केलं.. काही ठिकाणी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देत पुणेकरांनी पुन्हा एकदा जुन्याच चेहऱ्यांवर विश्वास टाकला. मात्र सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असणाऱ्या काही उमेदवारांना पुणेकरांनी मत देणं टाळल्याचं चित्र दिसलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे, शिवसेना (उबाठा)चे वसंत मोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांचा समावेश आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत यंदा विशेष लक्ष होतं ते वसंत मोरे आणि रूपाली ठोंबरे यांच्या प्रभागांकडे. सोशल मीडियावर हजारो-लाखो व्ह्यूज मिळवणाऱ्या या दोघांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्ष निकालात पुणेकरांनी त्यांना अपेक्षित मतांची खिरापत दिलीच नाही.. खरं तर आक्रमक भूमिका आणि अजित पवार यांच्या खंद्या समर्थक म्हणून ओळख असलेल्या रूपाली ठोंबरे यांनी यंदा दोन प्रभागांतून निवडणूक लढवली. इंस्टाग्रामवर सुमारे ७५ हजार, तर फेसबुकवर तब्बल साडेतीन लाखाहून अधिक फॉलोवर्स असलेल्या रूपाली ठोंबरे यांनी प्रचारातही हटके शैली जपली. कधी बुलेट चालवत, तर कधी दुचाकीवर मागे बसून त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचल्या..मात्र दोन्ही प्रभागातून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं..मतमोजणीच्या दिवशी त्यांनी ईव्हीएमवरील नंबर मॅच होत नसल्याचा आरोप करत मतमोजणी केंद्रात आक्षेप नोंदवला. थेट जाळीवर चढून निषेध करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र अखेर पराभव स्वीकारावा लागला.

यामध्ये दुसरा क्रमांक लागतो तो शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांचा..कसबा पेठ पोटनिवडणुकीतील विजयानंतर चर्चेत आलेल्या रवींद्र धंगेकर यांचं नाव सोशल मीडियावर सातत्याने गाजत राहिलं...इंस्टाग्रामवर सुमारे ९६ हजार आणि फेसबुकवर अडीच लाख फॉलोवर्स असलेल्या धंगेकर यांनी यंदा महापालिका निवडणुकीत मुलगा प्रणव आणि पत्नी प्रतिभा यांना मैदानात उतरवलं...भाजप-सेना युती तुटल्यानंतर त्यांनी भाजपवर सोशल मीडियावरून जोरदार हल्लाबोल केला. व्यंगचित्रं, ट्वीट्स आणि पोस्ट्समधून टीका केली, मात्र त्याचा फायदा प्रत्यक्ष मतदानात झाला नाही. प्रभाग २४ मधून प्रणव धंगेकर यांचा भाजपचे गणेश बिडकर यांनी, तर प्रभाग २३ मधून प्रतिभा धंगेकर यांचा सोनाली आंदेकर यांनी पराभव केला..

तिसऱ्या क्रमांकावर येतात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे.. फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे यांची लढतही यंदा हाय-व्होल्टेज मानली जात होती. इंस्टाग्रामवर दीड लाखाच्या घरात तर फेसबुकवर तब्बल ६ लाखाहून अधिक फॉलोवर्स असलेल्या मोरे यांनी यंदा आपल्या मुलगा रुपेश यालाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.. हटके स्टाईल मध्ये त्यांनी सोशल मीडिया वरून आपला प्रचारही जोरात केला होता..खासदार संजय राऊत यांनीही मोरे पिता-पुत्रांसाठी सभा घेतली.मात्र प्रभाग क्रमांक ४० मधून भाजपच्या रंजना टिळेकर यांनी रुपेश मोरेंचा पराभव केला. दुसरीकडे, वसंत मोरे स्वतः प्रभाग ३८ मधून पराभूत झाले.



 

पुणेकरांनी दिलेला कौल पाहता तुम्ही सोशल मीडियावर लोकप्रिय असाल म्हणजे तुम्ही निवडून यालंच याची खात्री नाही..लाईक्स, शेअर्स आणि व्ह्यूजपेक्षा प्रत्यक्ष काम, स्थानिक संपर्क आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची असते हे या निमित्ताने दिसून आलंय.. सोशल मीडियावरील तुमच्या व्हिडिओला लाखात व्ह्यू असू शकतात, पण मतं मिळवायची असतील तर जमिनीवरचं कामच निर्णायक ठरतं हेच पुणेकरांनी यंदा दाखवून दिलं आहे..

Web Title : पुणे चुनाव: सोशल मीडिया लोकप्रियता वोटों में बदलने में विफल

Web Summary : पुणे महानगरपालिका चुनाव में मतदाताओं ने बीजेपी को पसंद किया। सोशल मीडिया की लोकप्रियता सफलता की गारंटी नहीं रही। भारी ऑनलाइन फॉलोइंग वाले हाई-प्रोफाइल उम्मीदवार हार गए। जमीनी काम और विश्वास ऑनलाइन चर्चा से ज्यादा महत्वपूर्ण साबित हुए।

Web Title : Pune Election: Social Media Popularity Fails to Translate into Votes

Web Summary : Pune voters favored BJP in PMC elections. Social media fame didn't guarantee success. High-profile candidates with massive online followings lost. Groundwork and trust proved more crucial than online buzz.