Pune Mayor : भाजपमधील अनेक दावेदार नाराज; पुण्यातील अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:35 IST2026-01-22T19:31:12+5:302026-01-22T19:35:01+5:30

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Municipal Election Results 2026 Many BJP contenders are upset; Many Pune corporators' dreams of becoming mayor shattered | Pune Mayor : भाजपमधील अनेक दावेदार नाराज; पुण्यातील अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले

Pune Mayor : भाजपमधील अनेक दावेदार नाराज; पुण्यातील अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले

पुणे : पुणे महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर महापौरपद कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला होता. मात्र गुरुवारी जाहीर झालेल्या महापौरपदाच्याआरक्षण सोडतीने अनेक इच्छुकांच्या आशांवर पाणी फेरले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद भाजपकडेच जाणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र आरक्षण अंतिम न झाल्याने महापौरपदाच्या नावावर सस्पेन्स कायम होता.

याआधी २०१२ साली महापौरपद महिला ओबीसीसाठी तर २०१७ मध्ये सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित होते. त्या वेळी अनेक पुरुष नगरसेवकांना संधी मिळाली होती. यंदा मात्र महिला सर्वसाधारण आरक्षण जाहीर होताच भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या महापौरपदाच्या महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्या आहेत.

पालिकेचा निकाल लागल्यानंतर अनेक इच्छुकांनी आपणच महापौर होणार, या अपेक्षेने तयारी सुरू केली होती. काही भागांत शुभेच्छांचे बॅनरही झळकले होते. मात्र आरक्षण महिलांसाठी निश्चित झाल्याने माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेंद्र शिळीमकर यांच्यासह अनेक नगरसेवकांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले आहे. आता भाजपकडून कोणत्या महिला नगरसेविकेच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : पुणे महापौर पद महिलाओं के लिए आरक्षित, दावेदार निराश

Web Summary : पुणे में महापौर का पद अब महिलाओं के लिए आरक्षित है, जिससे कई पुरुष भाजपा पार्षदों की उम्मीदें धराशायी हो गईं हैं। आरक्षण ड्रा के बाद, अटकलें लगाई जा रही हैं कि भाजपा द्वारा किस महिला पार्षद का चयन किया जाएगा।

Web Title : Pune Mayor Post Reserved for Women, Aspirants Disappointed

Web Summary : Pune's mayoral seat is now reserved for women, dashing the hopes of many male BJP corporators eyeing the position. The announcement followed the reservation draw, sparking speculation about which female corporator will be selected by the BJP.