Pune Municipal Election : प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:29 IST2025-11-28T10:29:26+5:302025-11-28T10:29:41+5:30
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली.

Pune Municipal Election : प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती
पुणे :पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती आल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २ हजार ८८३ हरकती सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे तर सर्वात कमी १४ हरकती बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ३५ लाख ५१ हजार ४६९ आहे.
त्यात दुबार मतदारांची नावे तब्बल तीन लाख ४४६ आहेत. पालिकेच्या ४१ पैकी १० प्रभागांमध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. या प्रारूप मतदार यादीवर आता हरकती नोदविण्याच्या मुदतीमध्ये वाढ करून ३ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचनांचा पाऊस पडणार आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सशुल्क विकत मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत प्रारूप मतदार यादीच्या विक्रीतून १५ लाख ४२ हजार २९७ रुपये मिळाले आहेत.