Pune Metro: गणेशोत्सवात रात्री दोनपर्यंत धावणार मेट्रो; मध्यवर्ती भागातील कसबा, मंडई, स्वारगेट स्थानके सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 10:55 IST2025-08-22T10:51:38+5:302025-08-22T10:55:22+5:30

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू राहणार असल्याने नागरिकांना रात्री उशिरापर्यंत देखावे पाहता येणार

pune metro will run till 2 am during Ganeshotsav Kasba peth Mandai Swargate stations in the central area will remain open | Pune Metro: गणेशोत्सवात रात्री दोनपर्यंत धावणार मेट्रो; मध्यवर्ती भागातील कसबा, मंडई, स्वारगेट स्थानके सुरू राहणार

Pune Metro: गणेशोत्सवात रात्री दोनपर्यंत धावणार मेट्रो; मध्यवर्ती भागातील कसबा, मंडई, स्वारगेट स्थानके सुरू राहणार

पुणे : गणेशोत्सव काळात गणपती देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशने (महामेट्रो) गणेशोत्सवात पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी सलग ४१ तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे भाविकांना देखावे पाहण्यासाठी सोयीचे होणार आहे.

पुण्यातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. देखावे पाहण्यासाठी राज्य आणि राज्याबाहेरील गणेशभक्त येतात. गणेशोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी महामेट्रोने रात्री उशिरापर्यंत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. यंदा गणेशोत्सवात पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही स्थानके नागरिकांना थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते. त्यामुळे प्रवाशांना गर्दी टाळून मेट्रोने गणेशोत्सव पाहण्यासाठी जाता येणार आहे. या काळात रात्री उशिरापर्यंत देखावे, गणपती पाहण्यासाठी येतात. त्यामुळे पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत. तसेच, मध्य वस्तीमधील मंडई, कसबा येथे गर्दी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे गर्दी टाळता येणार आहे. भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.

अशी वाढविण्यात आली वेळ

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दि. ०६ रोजी सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी रात्री ११ पर्यंत मेट्रो सेवा ४१ तास अखंड सुरू राहणार आहे. तर, दि. २७ ते २९ ऑगस्ट या गणेशेत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सुरू राहील, तर दि. ३० ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर या काळात मेट्रोसेवा सकाळी ६ ते रात्री २ पर्यंत सुरू राहणार आहे.

Web Title: pune metro will run till 2 am during Ganeshotsav Kasba peth Mandai Swargate stations in the central area will remain open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.