Pune Lok Sabha 2024: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार
By राजू हिंगे | Updated: April 23, 2024 19:32 IST2024-04-23T19:32:15+5:302024-04-23T19:32:58+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार

Pune Lok Sabha 2024: महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ २५ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ गुरुवारी ( दि.२५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर, आर पी आय चे शहराध्यक्ष संजय सोनावणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, प्रकाश भालेराव, राजाभाऊ कांबळे, संजय आल्हाट, नितीन वायदंडे, भरत लगड,, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर या वेळी उपस्थित होते. धीरज घाटे म्हणाले, कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पदयात्रेचा समारोप केला जाईल.