Pune Crime: दौंड तालुक्यात बोरीभडक येथे तृतीयपंथीयाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 14:53 IST2021-11-21T14:53:02+5:302021-11-21T14:53:18+5:30
खून नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध यवत पोलीस घेत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Pune Crime: दौंड तालुक्यात बोरीभडक येथे तृतीयपंथीयाचा खून
यवत : दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे पुणे - सोलापूर महामार्गालगत असलेल्या गायरानात तृतीयपंथीयाचा खून झाला आहे. खून नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध यवत पोलीस घेत असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सव्वीस वर्षीय बंटी असे खून झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव सांगितले जात आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच खून झाला असावा असा प्रथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. महामार्गालगत असलेल्या झाडी लगत रात्रीच्या वेळी अनेक तृतीयपंथी थांबलेले असतात. यावेळी तेथे दुचाकी व चारचाकी गाड्या थांबून नेमका काय प्रकार सुरू असतो? याचा संशय अनेक जणांना आहे.
या झाडीत गैरप्रकार होत असल्याचे अनेक स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र सदर ठिकाण लोकवस्ती पासून दूर असल्याने याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही. आता या ठिकाणी एका तृतीय पंथीयाचा खून झाल्याने हे ठिकाण चर्चेचा विषय बनले आहे. पोलीस तपासात यातील अनेक भानगडी उघडकीस येणार आहेत.