PMC Election 2026 : ऐन निवडणुकीत येवलेवाडीत सापडली एक लाखाची रोकड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:39 IST2026-01-15T13:36:44+5:302026-01-15T13:39:38+5:30

पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून आचारसंहितेचा भंग होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Pune Crime Cash worth Rs 1 lakh found in Yewalewadi | PMC Election 2026 : ऐन निवडणुकीत येवलेवाडीत सापडली एक लाखाची रोकड 

PMC Election 2026 : ऐन निवडणुकीत येवलेवाडीत सापडली एक लाखाची रोकड 

पुणे : खडीमशिन चौकात दोन चारचाकी वाहनांमध्ये भरारी पथकाला एक लाखाची रोकड (पाचशे रुपयांचे दोन बंडल), लिफाफे आणि वह्या असा मुद्देमाल मंगळवारी (दि.१३) तपासणीच्या दरम्यान सापडला. पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून आचारसंहितेचा भंग होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने मंगळवारी रात्री येवलेवाडी परिसरात वेगवेगळी पथके तयार करून शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.

अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, साहाय्यक पोलिस आयुक्त नम्रता देसाई, साहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली.

Web Title : पीएमसी चुनाव 2026: येवलेवाड़ी में चुनाव के दौरान एक लाख नकद जब्त

Web Summary : पुणे नगर निगम चुनाव के चलते खडीमशिन चौक के पास दो कारों से एक लाख रुपये नकद, लिफाफे और नोटबुक जब्त किए गए। पुलिस टीमों ने सूचना मिलने पर येवलेवाड़ी इलाके में तलाशी अभियान चलाया, जिसके परिणामस्वरूप जब्ती हुई।

Web Title : Cash Seized in Yewalewadi During PMC Election 2026 Patrol

Web Summary : Rupees one lakh in cash, envelopes, and notebooks were seized from two cars near Khadimashin Chowk during patrolling related to the Pune Municipal Corporation election. Police teams conducted searches in the Yewalewadi area following a tip-off, resulting in the seizure.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.