लोणावळ्यात भाजपचा स्वबळाचा नारा; पहिली यादी जाहीर, राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:23 IST2025-11-10T13:23:36+5:302025-11-10T13:23:47+5:30
पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार

लोणावळ्यात भाजपचा स्वबळाचा नारा; पहिली यादी जाहीर, राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार?
लोणावळा : मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरात युती आणि आघाडीसंदर्भात तर्कवितर्क सुरू असताना भाजपने अकरा उमेदवारांची यादी रविवारी रात्री जाहीर केली. आमदार सुनील शेळके यांचे समर्थक असलेल्या उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिल्याने शहरातील राजकारणाला नवे वळण लागणार आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप ताकदीनिशी सज्ज झाली असून, ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोणावळा शहरामध्ये केवळ भाजप या एकमेव पक्षाकडे १३ प्रभागांसाठी व नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवार असून, पुढील दोन दिवसांत उर्वरित उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा पक्षाकडून केली जाईल, अशी माहिती माजी राज्यमंत्री व निवडणूक प्रभारी संजय तथा बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेळके यांच्या गटाची उमेदवार चाचपणी
आमदार सुनील शेळके यांच्या गटाकडे अद्यापही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि इतर मित्रपक्ष यांची मिळून शहरांमध्ये विकास आघाडी तयार करण्याचा मानस चर्चेत होता; परंतु आता अनेकजण भाजपच्या गोटात सामील झाले तर काँग्रेसने ही स्वबळाचा नारा दिला आहे. प्रभाग क्रमांक पाचमधून सुभाष दिनकर यांनी भाजप प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लोणावळा शहरातील निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
भाजपचे जाहीर उमेदवार
प्रभाग क्र १ : सुधीर पारिटे व शुभांगी गोसावी
प्रभाग क्र ५ : सुभाष डेनकर व बिंदा गणात्रा
प्रभाग क्र ६ : दत्तात्रेय येवले व रेश्मा पठारे
प्रभाग क्र ७ : देविदास कडू व सुरेखाताई जाधव
प्रभाग क्र ११ : रचना सिनकर
प्रभाग क्र १२ : अभय पारख व विजयाताई वाळंज